शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

पनवेल शहरात एकाच दिवशी चार घरफोड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 01:04 IST

पनवेल परिसरात शनिवारी एकाच दिवशी चार वेगवेगळ्या घरफोड्यांत लाखो रुपयांचा ऐवज लंपास झाला आहे. याप्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले आहे.

पनवेल : पनवेल परिसरात शनिवारी एकाच दिवशी चार वेगवेगळ्या घरफोड्यांत लाखो रुपयांचा ऐवज लंपास झाला आहे. याप्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले आहे.करंजाडे येथील विजय आंग्रे यांच्या दूध डेअरीच्या छताचा पत्रा उखडून चोरट्यांनी आतील रोख रक्कम लंपास केली. शहरातील शिवाजी रोड येथील आशिष सहा यांच्या शूज दुकानाचे शटर उखडून चोरट्यांनी रोख रक्कम लंपास केली आहे. टिळक रोडवरील कनक हरी इमारतीमध्ये असलेल्या स्टेशनरी दुकानाचे शटर तोडून चोरी केली आहे. तशाच प्रकारे एका मेडिकल दुकानाचेसुद्धा शटर तोडून चोरट्यांनी रोख रक्कम लंपास केली आहे. याबाबतच्या तक्र ारी पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आल्या आहेत. चारही घटनेत चोरट्यांनी लाखोंचा ऐवज लंपास केला आहे. चारही घटनेत चोरट्यांनी दुकानाना टार्गेट केले आहे. यासंदर्भात पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील बाजारे यांच्याशी संपर्क साधला असता, दोन आरोपींना अटक केली असून अधिक तपास सुरू असल्याचे सांगितले. दरम्यान, सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध नसल्याने पोलिसांना तपासात अडचणी निर्माण होत आहेत.