शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यासह निवडणूक क्षेत्रांत शस्त्रमनाई

By admin | Updated: January 5, 2015 22:53 IST

कल्याण-डोंबिवली महानगरपालिके च्या प्रभाग क्रमांक ९२ तसेच उल्हासनगर महानगरपालिका प्रभाग क्रमांक १३ (अ) येथे येत्या १८ जानेवारीला पोटनिवडणूक होणार आहे.

ठाणे : राज्य निवडणूक आयोगाने ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १३(अ), ३४-(अ) आणि (ब), ६१-(अ), ६३-(अ) व कल्याण-डोंबिवली महानगरपालिके च्या प्रभाग क्रमांक ९२ तसेच उल्हासनगर महानगरपालिका प्रभाग क्रमांक १३ (अ) येथे येत्या १८ जानेवारीला पोटनिवडणूक होणार आहे. त्यामुळे या निवडणूक क्षेत्रात शस्त्रमनाई आदेश १९ जानेवारीपर्यंत जारी करण्यात आला आहे. या पोटनिवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता १२ डिसेंबर २०१४ पासून लागू झाली असून मतदान १८ जानेवारी २०१५ रोजी होणार आहे. त्याची मतमोजणी व निकाल १९ जानेवारी २०१५ रोजी होणार आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयात यापूर्वी वेगवेगळ्या पक्षांमध्ये राजकीय स्पर्धेपोटी वादविवाद होऊन वेगवेगळ्या निवडणुकीच्या संबंधांत दखलपात्र व अदखलपात्र गुन्हे दाखल झाले आहेत. आगामी ठाणे, कल्याण-डोंबिवली व उल्हासनगर महानगरपालिका पोटनिवडणुकीच्या निमित्ताने स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये आपसात भांडणतंटे होऊन हातघाईवर येण्याची शक्यता आहे. याप्रसंगी एखाद्या गटाकडून / व्यक्तीकडून हत्याराचा दुरुपयोग होऊन गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असून निवडणुकीच्या कार्यक्षेत्रातील शस्त्र परवानाधारक यांना शस्त्रांची ने-आण करण्याबाबतही प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. आयुक्तालयातील पोलीस उपायुक्त परिमंडळ-१, ठाणे अंतर्गत मुंब्रा पो.स्टे. परिमंडळ-५, वागळे इस्टेट अंतर्गत वर्तकनगर, वागळे इस्टेट, श्रीनगर पोलीस ठाण्यात, परिमंडळ-३, कल्याण अंतर्गत डोंबिवली पोलीस स्टेशन व परिमंडळ-४, उल्हासनगर अंतर्गत उल्हासनगर पोलीस हद्दीतील शस्त्र परवानाधारक यांना शस्त्र ताब्यात ठेवण्यास व बाळगण्यास मनाई करण्यात येत आहे. तथापि, छाननी समितीने ज्यांना सूट दिलेली आहे, त्या शस्त्र परवानाधारकांना हा मनाई आदेश लागू होणार नाही. ज्या परवानाधारकांना या आदेशान्वये छाननी समितीने सूट दिलेली आहे, त्या परवानाधारकांनी आपली शस्त्रे निवडणुकीच्या कोणत्याही कार्यक्रमादरम्यान वापरावयाची नाही. हा एकतर्फी आदेश जारी करण्यात आला आहे.