शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
3
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
4
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
5
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
6
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
7
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
8
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
9
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
10
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
11
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
12
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
13
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
14
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
15
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
16
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
17
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
18
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
19
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
20
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
Daily Top 2Weekly Top 5

निवृत्त मुख्याधिकाऱ्यांच्या मुलीच्या लग्नात फक्त १८ माणसे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2021 00:57 IST

कर्जतमध्ये पार पडलेल्या विवाहातून आदर्श

विजय मांडे लोकमत न्यूज नेटवर्क कर्जत : कर्जत नगर परिषदेत दोन टर्म मुख्याधिकारीपदी असलेले सेवानिवृत्त दादाराव अटकोरे यांनी आपल्या मुलीचा विवाह सोहळा अवघ्या अकरा जणांच्या उपस्थितीत संपन्न करून कोरोना महामारीच्या काळात समाजापुढे एक आदर्श ठेवला. आपल्या समारंभामुळे कोरोनाचा संसर्ग होऊ नये हाच त्यामागचा त्यांचा हेतू होता.

शासनाने कितीही निर्बंध आणले तरी त्यांचे तंतोतंत पालन होतेच असे नाही. पहिल्या लाटेमध्ये कोरोनाच्या भीतीने हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या लोकांमध्ये विवाह सोहळे उरकले गेले. त्यानंतर मध्यंतरी विवाह सोहळ्यासाठी ५० जणांची उपस्थिती असावी, असा आदेश होता. मात्र, तो आदेश बासनात गुंडाळून अनेक ठिकाणी विवाह सोहळ्याला दहापट गर्दी होत होती. हे झाले विवाह सोहळ्याचे. त्यापूर्वी होणाऱ्या साखरपुडा किंवा हळदी समारंभालाही ‘लक्षणीय’ गर्दी होत होती आणि यामुळेच अनेक गावांत कोरोनाने थैमान घातले आहे. कर्जत नगर परिषदेत दोन वेळा मुख्याधिकारी म्हणून काम केलेले सेवानिवृत्त झालेले दादाराव अटकोरे हे मूळचे नांदेड जिल्ह्यातील मालेगावचे. आपली कन्या डॉ. ऋतुजा हिचा विवाह थाटामाटात करण्याचा त्यांचा विचार होता. कारण त्यांच्या कुटुंबातील हे पहिलेच लग्न होते. मात्र, गेल्या वर्ष- सव्वावर्षापासून कोरोना महामारीचे संकट आले आणि सर्वच समारंभांवर शासनाने निर्बंध घातले. त्यामुळे इच्छा असूनही मनासारखे शुभकार्य करता येत नव्हते. त्यात अटकोरे शासकीय नोकरी केलेले असल्याने त्यांना काहीच अडचण नव्हती.

डॉक्टर असलेल्या ऋतुजाचे लग्न औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोडमधील गणपतराव सालवे यांच्या पायलट असलेल्या आकाशकुमारशी ठरले होते. त्यांनी शासकीय नियमांचे पालन करूनच लग्न सोहळा करायचे ठरविले व त्यांना सालवे कुटुंबीयांनी पूर्ण सहकार्य करण्याचे ठरविले.लग्नाचा दिवस उजाडला. राज कॉटेजमध्ये एका छोट्या सभागृहात लग्न सोहळा सुरू झाला. विवाह सोहळ्यासाठी २५ जणांच्या उपस्थितीची परवानगी होती. तरीही यावेळी वधू- वर यांच्यासह दोन्ही कुटुंबातील मिळून केवळ अकरा माणसे उपस्थित होती. दोन फोटोग्राफर, दोन बौद्धाचार्य, एक ब्राह्मण, दोन वाढपी, असे एकूण अठरा जण उपस्थित होते. विवाह बौद्ध धर्म व हिंदू धर्म, अशा दोन्ही पद्धतींनी पार पडला. वधू- वरांच्या मागे मामा उभे असतात. त्यांची कमतरता मंडप तयार करणाऱ्या दोघांना बोलवून, ती उणीव भरून काढली.

कोणीच निमंंत्रित नाहीया दोघांनीही आपापल्या गावी विवाह सोहळा करायचा नाही, असा ठाम निश्चय केला. त्याचे कारण होते सोहळ्यासाठी होणारी न आवरता येणारी गर्दी. त्यांनी कर्जतला लग्न सोहळा करण्याचे निश्चित केले. खरे तर अटकोरेंनी आपल्या सेवा काळात अनेक मित्र मिळविले होते. त्यांना तर बोलवावे लागेल, काय करावे? हे त्यांना सुचत नव्हते. अखेर कुणालाच निमंत्रित करायचे नाही, असे ठरवले. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईcorona virusकोरोना वायरस बातम्याmarriageलग्न