दीड दिवसाच्या गणपतीच्या विसर्जनास गेले अन् इकडे घर जळालं

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2022 22:49 IST2022-09-01T22:48:25+5:302022-09-01T22:49:11+5:30

घर जळाल्याने मोठ्या प्रमाणात घराचे नुकसान झाले आहे.

One and a half day Ganesha immersion went and here the house got burnt in navi mumbai kamothe | दीड दिवसाच्या गणपतीच्या विसर्जनास गेले अन् इकडे घर जळालं

दीड दिवसाच्या गणपतीच्या विसर्जनास गेले अन् इकडे घर जळालं

नवी मुंबई - येथील कामोठे सेक्टर ३६ मधील इंपिरियल हाईट ह्या 13 मजली इमारती च्या दुसऱ्या मजल्यावर आग लागली. घरातील नागरिक दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन सर्व कुटुंब घर बंद करून गेले असता घरात लावलेल्या दिव्याने अचानक पेट घेतला. त्यामध्ये, घर जळाल्याने मोठ्या प्रमाणात घराचे नुकसान झाले आहे.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच अग्निशम दलास कळवण्यात आले. मात्र, तोपर्यंत घरातील बरंच साहित्य जळून खाक झालं होतं. 

Web Title: One and a half day Ganesha immersion went and here the house got burnt in navi mumbai kamothe