शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

उरणच्या ओएनजीसी प्रकल्पाच्या तेल गळतीमुळे किनारा काळवंडला  

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2023 18:44 IST

लाखो लिटर्स क्रूड ऑइल मागणीदेवीच्या नाल्यातून थेट समुद्रात पोहचल्याने मोठ्या प्रमाणावर जलप्रदूषण झाले आहे.

मधुकर ठाकूर -

उरण : येथील ओएनजीसी प्रकल्पातील क्रूड ऑइल साठवणीच्या नादुरुस्त व्हाल्वमुळे शुक्रवारी पहाटेच्या सुमारास मोठ्या प्रमाणावर गळती लागली.यामुळे लाखो लिटर्स क्रूड ऑइल मागणीदेवीच्या नाल्यातून थेट समुद्रात पोहचल्याने मोठ्या प्रमाणावर जलप्रदूषण झाले आहे.पीरवाडी समुद्र किनाऱ्यावरील परिसरात तेलाचे जाड थर निर्माण झाल्याने समुद्र काळवंडला आहे.परिसरातील मासेमारीही धोक्यात आली असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान ओएनजीसी प्रशासनाने किनाऱ्यावरील जमा झालेले ऑईलचे थर मशिन, कामगारांच्या साहाय्याने ड्रममध्ये भरुन गोळा करण्याचे काम पहाटेपासूनच युध्दपातळीवर सुरू केले आहे.

येथील ओएनजीसी प्रकल्पातील क्रूड ऑइलच्या साठवण टाकीला शुक्रवारी (८) पहाटे गळती लागली. मोठ्या प्रमाणावर लागलेल्या गळतीमुळे क्रूड ऑइलचे थर संरक्षक भिंती जवळ असलेल्या मागणीदेवीच्या नाल्यातुन थेट पीरवाडी परिसरातील किनाऱ्यावर पोहचले.ओएनजीसी व्यवस्थापनाला गळतीची माहिती मिळाल्यानंतर पहाटेपासूनच किनाऱ्यावर जमा झालेले ऑईलचे जाड थर कामगार लाऊन ड्रम, बादली, सक्शन पंपने गोळा केले जात आहेत.मात्र नाल्यातुन वाहत गेलेले क्रूड ऑइल थेट समुद्रात पोहचल्याने पाण्यावर तेलतवंग दिसु लागले आहेत.यामुळे मोठ्या प्रमाणावर सागरी प्रदुषण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.जलप्रदुषणामुळे परिसरातील स्थानिक मासेमारीही धोक्यात आली असल्याची भीती मच्छीमारांकडून व्यक्त केली जात आहे.परिसरातील शेतीलाही धोका निर्माण झाला असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे. ओएनजीसीत वारंवार घडणाऱ्या तेल गळतीच्या घटनांमुळे परिसरातील नागरिकांना श्वसनाचे विकार होऊ लागले आहेत.त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.त्याशिवाय वारंवार तेल गळतीच्या प्रकारामुळे परिसरातील हजारो नागरिकांची सुरक्षाही धोक्यात आली आहे.याआधीच तेल गळतीमुळे लागलेल्या भीषण आगीत अधिकारी, अग्निशमन दलाच्या जवानांसह पाच जण मृत्यू पावले आहेत.उरण ओएनजीसी प्रकल्पात जुने जाणकार आणि अनुभवी कामगार सेवानिवृत्त झाले आहेत. नव्याने भरती झालेले अधिकारी आणि कामगार यांना प्रकल्पाची फारसी माहिती नसल्यामुळेच प्रकल्पात वारंवार तेल गळतीचे प्रकार घडत असल्याचा गंभीर आरोप स्थानिक कामगारांकडून केला जात आहे.याप्रकरणी अधिक माहितीसाठी ओएनजीसी प्रशासनाच्या संपर्कात असल्याची माहिती उरण तहसीलदार डॉ.उध्दव कदम यांनी दिली.

प्रकल्पातील साठवण टाकीच्या व्हाल्वच्या लिकेजमुळे क्रूड ऑइल नाल्यातुन थेट समुद्र किनाऱ्यावर पोहोचले आहे.गळतीमुळे किनाऱ्यावर जमा झालेले तेल जमा करण्याचे पहाटेपासूनच युध्दपातळीवर सुरू करण्यात आले आहे.समुद्रात पोहचण्याआधीच तेल जमा करण्यात येत असल्याने परिसरातील मासेमारी,शेती  आणि नागरिकांना कोणत्याही प्रकारचा धोका नसल्याचे मुख्य प्रकल्प अधिकारी सुभोजीत बोस यांनी सांगितले. 

 

टॅग्स :water pollutionजल प्रदूषणWaterपाणी