शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

‘नैना’च्या मार्गात अडथळा

By admin | Updated: September 15, 2015 23:29 IST

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रभावित क्षेत्र अर्थात ‘नैना’ क्षेत्रात बेकायदा बांधकामांचे पेव फुटले आहेत. सिडकोच्या अतिक्रमण नियंत्रण विभागाला बेकायदा बांधकामांना प्रतिबंध घालण्यात

- कमलाकर कांबळे,  नवी मुंबईनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रभावित क्षेत्र अर्थात ‘नैना’ क्षेत्रात बेकायदा बांधकामांचे पेव फुटले आहेत. सिडकोच्या अतिक्रमण नियंत्रण विभागाला बेकायदा बांधकामांना प्रतिबंध घालण्यात सपशेल अपयश आले आहे. त्यामुळे दिवसेंदिवस वाढणाऱ्या अतिक्रमणांमुळे ‘नैना’ क्षेत्राच्या नियोजनाला अडथळा निर्माण होण्याची शक्यता जाणकारांकडून वर्तविण्यात येत आहे.विमानतळ प्रभावित क्षेत्रात मोडणाऱ्या ठाणे, पनवेल, कर्जत, खालापूर, पेण आणि उरण या तालुक्यातील २५ किलोमीटर क्षेत्रासाठी शासनाने सिडकोची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती केली आहे. त्यानुसार या क्षेत्राचा विकास प्रस्ताव आणि विकास नियंत्रण नियमावली तयार करण्याची जबाबदारी आता सिडकोवर आली आहे. त्यामुळे या परिसरात कोणतेही बांधकाम किंवा विकास प्रकल्प राबविताना सिडकोची परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच ग्रामपंचायत आणि स्थानिक प्राधिकरणाला बांधकाम परवानगी देण्याचे असलेले पूर्वीचे अधिकार काढून घेण्यात आले आहेत. असे असले तरी निर्धारित कालावधीत सिडकोने नैना क्षेत्राचा विकास आराखडा तयार न केल्याने या परिसरातील विकास प्रकल्प ठप्प पडले आहेत. इतकेच नव्हे, तर बांधकाम परवानगी देताना सिडकोने अनेक अटी व शर्ती लागू केल्याने विकासकांची कोंडी झाली आहे. याचा परिणाम म्हणून अनेकांनी परवानगी न घेताच बांधकामांचा सपाटा लावला आहे. ही बाब भूमाफियांच्या पथ्यावर पडल्याने रातोरात नवीन इमारती उभारल्या जात आहे. मध्यंतरी सिडकोने या क्षेत्रातील जवळपास तीनशे बांधकामांना नोटिसा बजावल्या होत्या. काही प्रमाणात कारवाई सुध्दा सुरू करण्यात आली होती. मात्र या कारवाईला न जुमानता अनधिकृत बांधकामे सुरूच असल्याने सिडकोसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. सिडकोने पहिल्या टप्प्यातील त्या २३ गावांवर सध्या आपले लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे नैना क्षेत्रात मोडणाऱ्या २७0 पैकी उर्वरित गावांच्या परिसरात भूमाफियांनी धुमाकूळ घातला आहे. रातोरात येथे नवीन बांधकामे उभारली जात आहेत. या प्रकाराला आळा घालण्यात सिडकोच्या अतिक्रमण विरोधी पथकाला अपयश येताना दिसत आहे.नैनाच्या पहिल्या टप्याचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यामुळे सध्या याच विभागावर आमचा फोकस असणार आहे. विकास आराखड्याला कोणत्याही प्रकारे धक्का लागू नये, त्यादृष्टीने उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. अतिक्रमणांना प्रतिबंध घालण्यासाठी विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. भविष्यात नैनाच्या संपूर्ण परिसरावर नियंत्रण ठेवण्यासाठी अतिरिक्त उपायोजना कराव्या लागणार आहेत. त्यासाठी सक्षम यंत्रणा उभारण्याची गरज असून त्यादृष्टीने कार्यवाही सुरू आहे.-संजय भाटीया, व्यवस्थापकी संचालक, सिडको