शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
3
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
4
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
5
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
6
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
7
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
8
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
9
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
10
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
11
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
12
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
13
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
14
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
15
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
16
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
17
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
18
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
19
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
20
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
Daily Top 2Weekly Top 5

फ्लेमिंगो अभयारण्यालगत प्रकल्प नको; पर्यावरणप्रेमी आक्रमक; सिडको, नगरविकास विभाग, सीआरझेडकडे मागितली दाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 13:26 IST

शहरातील पर्यावरणप्रेमींनी या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची मागणी करत सिडको, नगरविकास विभाग, सीआरझेड प्राधिकरण, रेरा तसेच राज्य पर्यावरण प्रभाव मूल्यांकन प्राधिकरण यांना पत्रे पाठवून दाद मागितली.

नवी मुंबई : पाम बीच मार्गावरील नेरूळ सेक्टर-६० येथे फ्लेमिंगो अभयारण्यालगत उभारल्या जात असलेल्या वादग्रस्त गृहनिर्माण प्रकल्पावर नवा ट्विस्ट आला आहे. या प्रकल्पामुळे चर्चेत आलेल्या मिस्त्री कन्स्ट्रक्शन कंपनीने अखेर महाराष्ट्र सागर किनारा प्राधिकरणासमोर सादर केलेला प्रस्ताव ‘प्रकल्पाच्या नियोजनात बदल’ झाल्याचे कारण देत मागे घेतला आहे. परंतु, भविष्यातही कुठलाही फेरबदल करून हा प्रकल्पच राबवता कामा नये, असा पवित्रा पर्यावरणप्रेमींनी घेतला आहे.

शहरातील पर्यावरणप्रेमींनी या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची मागणी करत सिडको, नगरविकास विभाग, सीआरझेड प्राधिकरण, रेरा तसेच राज्य पर्यावरण प्रभाव मूल्यांकन प्राधिकरण यांना पत्रे पाठवून दाद मागितली. या गृहनिर्माण प्रकल्पाबाबत पर्यावरणीय व नियामक प्रश्न उपस्थित झाले असून, पर्यावरणप्रेमींनी विविध निवेदने, माहिती अधिकार अर्ज आणि पत्रव्यवहारांच्या माध्यमातून या प्रकल्पातील अनेक बाबी पुढे आणल्या आहेत. 

९३३.०२ चौ.मी.चा नैसर्गिक जलसाठानगरविकास विभागाने १३ जानेवारी रोजी सिडकोला पाठवलेल्या पत्रात महत्त्वाची बाब स्पष्ट केली आहे. त्यानुसार प्रकल्पाच्या जागेवरील पॉकेट ‘डी’ आणि ‘ई’ या भागात सुमारे ९३३.०२ चौ. मी. क्षेत्रफळाचा नैसर्गिक ‘जलसाठा’ (वॉटर बॉडी) अस्तित्वात आहे. हा भाग नैसर्गिकरीत्या पाण्याखाली राहणे अपेक्षित असल्याने येथे बांधकाम करता येणार नाही. २७ हजार चौ. मी. भूखंडाच्या एफएसआयमध्येही समावेश करता येणार नाही. 

पर्यावरणप्रेमींचा दावा काय? प्रस्तावातील ६५०० चौ. मी.चे सीआरझेड क्षेत्र हे २०२३ मध्ये मंजूर झालेल्या किनारी क्षेत्र व्यवस्थापन आराखड्यावर आधारित आहे. ज्या काळात बांधकामाला पर्यावरणीय मंजुरी दिली, त्यावेळी जुन्या आराखड्यानुसार या भूखंडाचा मोठा भाग सीआरझेड क्षेत्रात येत होता. त्यामुळे सीआरझेडची पूर्वमंजुरी न घेता बांधकाम सुरू झाले होते का? नियोजन परवानग्या, प्रकल्प नोंदणीत नियमांचे पालन झाले का? असे गंभीर प्रश्न पर्यावरणप्रेमींनी उपस्थित केले.

सीआरझेडची परवानगी महत्त्वाची अट दरम्यान, प्रकल्पाच्या प्रवर्तकांनी या भूखंडातील सुमारे ६५०० चौ. मी. क्षेत्रासाठी सीआरझेड मंजुरी मिळवण्याचा प्रस्ताव प्राधिकरणाकडे सादर केला होता. या प्रस्तावावर चर्चा करताना प्राधिकरणाने प्रकल्पाची जमीन विद्यमान रस्त्याच्या ‘लँडवर्ड साइड’मध्ये येते का? असा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला होता. सीआरझेड नियमांनुसार बांधकाम परवानगीसाठी ही अत्यंत महत्त्वाची अट मानली जाते.

‘पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील भागातील मोठ्या विकास प्रकल्पांमध्ये पारदर्शकता, सार्वजनिक छाननी आणि नियामक उत्तरदायित्व अत्यावश्यक आहे. या प्रकरणातील सर्व बाबींची सखोल चौकशी व्हावी.’ सुनील अगरवाल, ‘सेव्ह नवी मुंबई एन्व्हायर्नमेंट’

सध्याचे बांधकाम क्षेत्र सीआरझेड (किनारी नियमन क्षेत्र)च्या बाहेर असून, त्यासाठी कोणत्याही मंजुरीची आवश्यकता नाही. या प्रकल्पाचे काम संबंधित प्राधिकरणांनी घालून दिलेल्या लागू नियमांचे आणि अधिनियमांचे पालन करून केले जात आहे. प्रवक्ते, मिस्त्री कन्स्ट्रक्शन कंपनी प्रायव्हेट लिमिटेड

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई