आज राज्यातील महायुती सरकारला एक वर्ष पूर्ण होत आहे. मागील वर्षी याच दिवशी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. दरम्यान, आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबईकरांसाठी एक मोठी अपडेट दिली आहे. आता बेलापूर आणि नेरुळमधून उरणला जाण्यासाठी गाड्यांच्या फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. ही माहिती फडणवीस यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर दिली.
मागील अनेक दिवसांपासून उरण येथील नागरिकांनी लोकलच्या फेऱ्या वाढवण्याची मागणी केली होती. या मागणीला आता यश आले आहे. आता नेरुळ-उरण-नेरुळ (4 फेऱ्या) आणि बेलापूर-उरण-बेलापूर (6 फेऱ्या) या अतिरिक्त लोकल सेवा सुरू करण्यात आल्या आहेत. तसेच तारघर आणि गव्हाण येथे स्टेशन मंजूर करण्यात आले आहेत.
"मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि मा. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णवजी यांनी माझ्या निवेदनाला मान देत, नेरुळ-उरण-नेरुळ (4 फेऱ्या) आणि बेलापूर-उरण-बेलापूर (6 फेऱ्या) या अतिरिक्त लोकल सेवा सुरू केल्याबद्दल तसेच तारघर आणि गव्हाण येथे स्टेशन मंजूर केल्याबद्दल त्यांचे मनस्वी आभार! या निर्णयामुळे मुंबईकरांचा रोजच्या प्रवासातील मोठा त्रास कमी होईल आणि नवी मुंबई व आसपासच्या भागातील लाखो प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल, असंही मुख्यमंत्री फडणवीस यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
Web Summary : New Year's gift for Navi Mumbai! Local train trips increased for Nerul-Uran-Belapur routes. Targhar and Gavhan will get new stations, says CM.
Web Summary : नवी मुंबई के लिए नए साल का तोहफा! नेरुल-उरण-बेलापुर मार्गों के लिए लोकल ट्रेन यात्राएं बढ़ाई गईं। मुख्यमंत्री ने कहा, तारघर और गव्हाण में नए स्टेशन बनेंगे।