नाईकांना शह देण्यासाठी राष्ट्रवादीची मोर्चेबांधणी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2019 01:39 AM2019-08-03T01:39:18+5:302019-08-03T01:39:24+5:30

तीन नेत्यांवर जबाबदारी : बैठकीला १३ नगरसेवकांची उपस्थिती; शनिवारी शरद पवारांची भेट घेणार

NCP's frontline to check heroes | नाईकांना शह देण्यासाठी राष्ट्रवादीची मोर्चेबांधणी

नाईकांना शह देण्यासाठी राष्ट्रवादीची मोर्चेबांधणी

Next

नवी मुंबई : पक्षाची पडझड रोखून नाईकांना शह देण्यासाठी राष्ट्रवादी काँगे्रसने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. नेरूळमध्ये झालेल्या महत्त्वाच्या बैठकीला पक्षाचे १३ नगरसेवक उपस्थित होते. सर्व पदाधिकारी शनिवारी शरद पवार यांची भेट घेणार आहेत.
विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, माजी मंत्री शशिकांत शिंदे, आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक झाली. शहरातील पक्षाची पडझड रोखण्यासाठीची चर्चा या बैठकीमध्ये करण्यात आली.

पक्षांतर करताना सर्व ५२ नगरसेवक व ५ अपक्ष नगरसेवक सोबत असल्याचा दावा नाईक समर्थकांनी केला होता. परंतु प्रत्यक्षात राष्ट्रवादीमध्ये राहू इच्छिणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. सीबीडीमधील तीनही नगरसेवकांनी पक्षासोबत असल्याचे स्पष्ट करून बैठकीला हजेरी लावली. तुर्भे एमआयडीसी परिसरावर वर्चस्व असलेले सुरेश कुलकर्णी यांचे चार नगरसेवक, तुर्भे परिसरातील दोन नगरसेविका, सानपाडामधील १ व कोपरखैरणेमधील शंकर मोरे, सायली शिंदे बैठकीला उपस्थित होते. अजूनही अनेकांनी फोन करून आम्ही सोबत असल्याची ग्वाही दिल्याची माहिती नगरसेवकांनी बैठकीमध्ये दिली. २० ते २५ नगरसेवक पक्षातच राहतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. राष्ट्रवादीचे नगरसेवक व पदाधिकारी शनिवारी सायंकाळी मुंबईमध्ये पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत. या बैठकीमध्ये नवीन जिल्हा अध्यक्ष घोषित करण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पक्षाचे पदाधिकारी, बाजार समितीशी संबंधित घटकांना सोबत घेऊन पक्षाची पडझड रोखण्यावर या वेळी चर्चा झाली.

भाजपत गेल्यास नगरसेवकपद धोक्यात
च्माजी मंत्री गणेश नाईक यांच्यासोबत पक्षाचे सर्व ५२ नगरसेवक असल्याचा दावा समर्थकांनी केला होता. परंतु नाईक समर्थकांमधील फूट वाढू लागली आहे. नुकत्याच महापौर बंगल्यावर झालेल्या बैठकीत काही नगरसेवक अनुपस्थित होते.
च्१३ नगरसेवकांनी राष्ट्रवादीमध्येच राहण्याचा निर्णय घेतला असून हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. नाईक समर्थकांनी भाजपत प्रवेश केल्यास पक्षांतरबंदी कायद्याप्रमाणे त्यांचे नगरसेवकपद रद्द करण्याची मागणी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पक्षांतर्गत हालचालींना वेग आला आहे.

नवी मुंबईमधील राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये राहणाºया नगरसेवकांची संख्या वाढत आहे. शुक्रवारच्या बैठकीला १३ पेक्षा जास्त नगरसेवक उपस्थित होते. ही संख्या २५ पर्यंत वाढेल असा विश्वास आहे. शनिवारी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची सर्व जण भेट घेऊन पक्ष बळकटीसाठी वेगाने काम केले जाईल.
- अशोक गावडे,
नगरसेवक, राष्ट्रवादी काँगे्रस

Web Title: NCP's frontline to check heroes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.