शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

सायनमध्ये राष्ट्रवादीने घेतली प्रचारात मुसंडी

By admin | Updated: October 11, 2014 03:28 IST

सायन कोळीवाडा मतदारसंघातून निवडणूक लढणारे राष्ट्रवादीचे उमेदवार प्रसाद लाड यांना प्रत्येक समाज, व्यावसायिक संघटनांकडून उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे.

मुंबई : सायन कोळीवाडा मतदारसंघातून निवडणूक लढणारे राष्ट्रवादीचे उमेदवार प्रसाद लाड यांना प्रत्येक समाज, व्यावसायिक संघटनांकडून उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे. कोणी पत्र देऊन तर कोणी लाड यांच्या प्रचारात सहभागी होऊन आपला पाठिंबा व्यक्त करत आहेत.लाड हे उद्योजक असून म्हाडाच्या इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे सभापती आहेत. पद नसताना त्यांनी केलेले समाजकार्य मोठे आहे. याशिवाय म्हाडाच्या माध्यमातून त्यांनी जे कार्य केले त्यामुळे अधिकाधिक मतदार त्यांच्याकडे आकर्षित होत असल्याची प्रतिक्रिया रहिवाशांकडून व्यक्त केली जात आहे.प्रतीक्षा नगर व्यापारी मंडळ, मांजरेकर व्यापारी मंडई, विश्वशांती बुद्धविहार समिती, जयभीम मित्रमंडळ, पंचशील महिला मंडळ, बुद्धधर्म उत्कर्ष यशोदा महिला मंडळ, विशाखा धम्म जागृती महिला मंडळ, बौद्ध जन पंचायत समिती, दक्षिण भारतीयांचा देवेंद्र समाज, मुदलीयार, कर्नाटक, तेवर, नाडरा, तेलगू समाज, शिखांचा दशमेश दरबार, मुस्लीम समाजातील आक्सा कमिटी, नेहर जबीन कमिटी, उलेमा कौन्सिल, सुलेमान कमिटी, तसेच सायन-कोळीवाड्यातील अनेक छोट्या-मोठ्या मंडळांनी लाड यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे.याशिवाय येथील ख्रिश्चन, गुजराती, मारवाडी, कच्छी आणि जैन समाजानेही लाड यांच्यासोबत राहण्याचे आश्वासन दिले आहे. यामुळे ठिकठिकाणी लाड यांचे जंगी स्वागत होत आहे. (प्रतिनिधी)