Navi Mumbai: महाराजांचा अपमान सहन करणार नाही, दडपशाही जुमानणार नाही; अमित, आदित्य यांचा सरकारला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 12:27 IST2025-11-18T12:26:25+5:302025-11-18T12:27:40+5:30
नवी मुंबईतील नेरूळ येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे विनापरवानगी अनावरण केल्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थीसेनेचे अध्यक्ष अमित राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

Navi Mumbai: महाराजांचा अपमान सहन करणार नाही, दडपशाही जुमानणार नाही; अमित, आदित्य यांचा सरकारला इशारा
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: नवी मुंबईतील नेरूळ येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे विनापरवानगी अनावरण केल्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थीसेनेचे अध्यक्ष अमित राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्रात, शिवछत्रपतींच्या भूमीत महाराजांचा अपमान सहन करणार नाही. महाराजांसाठी गुन्हा दाखल झाल्याने बरे वाटले, अशी प्रतिक्रिया अमित यांनी दिली आहे. तर, उद्धवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी ही दडपशाही महाराष्ट्र जुमानणार नाही, असा इशारा सरकारला दिला आहे.
पत्रपरिषदेत अमित म्हणाले, शाखा उद्घाटनासाठी नवी मुंबईत गेलो असता लोकार्पणासाठी नेता मिळत नाही म्हणून तब्बल चार महिने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा घाणेरड्या कपड्यांनी झाकलेला असल्याचे कळले. पदाधिकाऱ्यांनी पालिकेला तीन दिवसांचा अल्टिमेट देण्याचा सल्ला दिला होता. अल्टिमेटम देणार, पोलिस सुरक्षा लागणार, यापेक्षा लोकार्पण करण्याचे ठरवले. त्यावर त्यांनी केस होईल, असे सांगितले.
आमदार आदित्य यांनी चार महिने घाणेरड्या कापडाने झाकून
ठेवलेला महाराजांच्या पुतळ्यावरचे कापड काढून त्याचे अमित यांनी अनावरण केले. महाराजांचा अपमान सहन न झाल्याने त्यांनी असे केले. महाराजांचा सन्मान राखणाऱ्यावर केस करता? निवडणूक आयोग व सरकारची ही दादागिरी मोडून काढू, अशी केलेली पोस्ट वाचली. प्रत्येक मराठी माणूस महाराजांसाठी पेटून उठतो. त्यात राजकारण पाहत नाही, असे अमित
यांनी सांगितले.