नवी मुंबई: तरुणीने प्रेमसंबंध तोडले अन् तो नैराश्यामध्ये गेला, नंतर थेट घरावरच...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 17:34 IST2025-07-23T17:32:31+5:302025-07-23T17:34:25+5:30
Navi Mumbai Crime news: नवी मुंबईमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका ३३ वर्षीय तरुणासोबत तरुणीने प्रेमसंबंध तोडले. त्यानंतर जे घडलं ते भयंकर होतं.

नवी मुंबई: तरुणीने प्रेमसंबंध तोडले अन् तो नैराश्यामध्ये गेला, नंतर थेट घरावरच...
Navi Mumbai Crime Latest news: दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. पण, तरुणीने अचानक त्याच्यासोबतचे संबंध तोडले आणि बोलणं बंद केलं. प्रेयसी बोलत नसल्याने तो तिला मनधरणी करत होता. ती प्रेमसंबंध कायम ठेवण्यास तयार होत नव्हती. त्यामुळे तो हळूहळू नैराश्यामध्ये गेला. त्यानंतर त्याने जे केलं, ते चक्रावून टाकणार होतं.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
ही घटना नवी मुंबईतील घणसोलीमध्ये घडली. तरुणीने प्रेमसंबंध तोडल्याने संतापलेल्या तरुणाने तिच्या घरावर हल्ला केल्याची घटना घणसोलीत घडली आहे. तरुणीच्या घरात घुसून तो मारहाण करत असताना शेजाऱ्यांनीही त्याला अडवण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान त्याने रस्त्यावर उभ्या दोन वाहनांची तोडफोड केली आहे.
नक्की काय घडलं?
घणसोली परिसरात शनिवारी रात्री ही घटना घडली असून तरुणीच्या तक्रारीवरून सदर तरुणावर रविवारी रबाळे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ३३ वर्षीय तरुणाचे घणसोली परिसरातील तरुणीसोबत प्रेमसंबंध होते.
तरुणीने अचानक संबंध तोडल्याने तो नैराश्यात गेला होता. त्याने अनेकदा तिची मनधरणी करण्याचा प्रयत्न करूनही त्याला यश आले नाही. अखेर शनिवारी रात्री तो थेट तरुणीच्या घरी धडकला.
तरुणीच्या घरी जाऊन केला राडा, वाहनेही फोडली
त्याने तरुणीच्या नातेवाइकांना शिवीगाळ करत तिला मारहाणीला सुरुवात केली. शेजारी राहणारेही तरुणीच्या मदतीला आले असता त्याने त्यांनाही शिवीगाळ केली.
त्यानंतर रस्त्यावर उभ्या असलेल्या टेम्पो व रिक्षावर दगड मारून दोन्ही वाहनांचे नुकसान केले. त्याला अडविण्यासाठी आलेल्यांना त्याने धक्काबुक्की केली. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.