शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबईमध्ये कोरोनामुक्तीचे प्रमाण घसरल्याने धोका वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 01:29 IST

एक महिन्यात दहा टक्के घसरण : बरे होण्याचे प्रमाण ९५ वरून ८५ टक्यांवर 

- नामदेव मोरेलोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : कोरोनाची दुसरी लाट शहरवासीयांसाठी धोकादायक ठरली आहे. नवी मुंबईमध्ये रुग्ण बरे होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. १ मार्चला कोरोनामुक्तीचे प्रमाण ९५ टक्के होेते. त्यामध्ये घसरण होऊन ते ८५ टक्यांवर आले आहे. यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढत असून अशीच स्थिती राहिली तर रुग्णालयात जागा मिळणार नाही व प्रतिदिन मृत्यूची संख्या वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेने फेब्रुवारीअखेरपर्यंत कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात बऱ्यापैकी यश मिळविले होते. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५ टक्क्यांपर्यंत पोहोचले होते. मृत्यूदर दीड टक्क्यावर आला होता व फक्त साडेतीन टक्के रुग्ण उपचार घेत होते. शहरातील तीन नागरी आरोग्य केंद्राचा परिसर कोरोनामुक्त झाला होता; परंतु मार्चच्या सुरुवातीपासून झपाट्याने रुग्ण संख्या वाढू लागली व महानगरपालिकेच्या उपाययोजना अपुऱ्या पडू लागल्या. सद्य:स्थितीमध्ये रुग्णालयांमधील बेड अपुरे पडू लागले आहेत. व्हेंटिलेटर्स, आयसीयूमध्ये जागा मिळणे अशक्य होऊ लागले आहे. वेळेत उपचार मिळत नसल्याने मृत्यूचा आकडा वाढत आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण घसरू लागले आहे.

सद्य:स्थितीमध्ये कोरोनामुक्तीचे प्रमाण दहा टक्क्यांनी घसरून ८५ टक्क्यांवर आले आहे. वाशी गाव नागरी आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात हे प्रमाण ८० टक्के झाले आहे. करावे, सीबीडी, जुहूगाव, महापे, सिवूड, पावणे, नोसील नाका, इलठाणपाडा, कातकरीपाडा, चिंचपाडा, इंदिरानगर परिसरातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८५ टक्क्यांपेक्षा कमी आहे. कोरानामुक्तीचे प्रमाण वाढले नाही तर त्याचे गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. नवीन रुग्णांना उपचारासाठी बेड उपलब्ध होणार नाहीत व त्यामुळे मृत्यू होणारांची संख्या वाढण्याची भीतीही व्यक्त केली जात होती. फेब्रुवारीमध्ये सरासरी १ ते २ जणांचा प्रतिदिन मृत्यू होत होता. सद्य:स्थितीमध्ये सरासरी ५ जणांचा मृत्यू होत असून शुक्रवारी एकाच दिवशी ९ जणांचा मृत्यू झाला आहे. 

दिघासह घणसोलीमध्ये कोरोनामुक्तीचे प्रमाण ८८%शहरातील दिघा व घणसोली नागरी आरोग्य केंद्राच्या परिसरात कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण सर्वांत जास्त आहे. दोन्ही ठिकाणी ८८ टक्के रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सानपाडा व नेरूळ झाेन एकमध्ये ८७ टक्के, खैरणे, रबाळे, ऐरोली, शिरवणे, तुर्भे परिसरात ८६ टक्के रुग्ण बरे झाले आहेत. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस