Kharghar Power Cut: वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे खारघर १८ तास अंधारात, नागरिक संतप्त!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 09:46 IST2025-06-26T09:45:01+5:302025-06-26T09:46:25+5:30

Kharghar Power Cut News: वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे खारघरमधील रहिवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला.

Navi Mumbai: Kharghar Under Darkness For 18 Hours Due To Power Outage | Kharghar Power Cut: वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे खारघर १८ तास अंधारात, नागरिक संतप्त!

Kharghar Power Cut: वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे खारघर १८ तास अंधारात, नागरिक संतप्त!

Kharghar Electricity Issue:  वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे खारघरमधील रहिवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. खारघरमध्ये मंगळवारी दुपारी ४ वाजल्यापासून बुधवारी सकाळी १० वाजेपर्यंत म्हणजेच १८ तास वीजपुरवठा खंडीत होता. सेंट्रल पार्कजवळ राहणाऱ्या एका रहिवाशाने सांगितले की, “खारघरमध्ये गेल्या काही दिवसांपासून दररोज सुमारे ४० मिनिटे लाईट जाते.”

वीजपुरवठा खंडीत झाल्याने खारघरमधील सेक्टर १२ ते सेक्टर ३० आणि ३६ पर्यंतच्या अनेक भागात याचा परिणाम झाला. वीजवाहिनी तुटली आणि आगही लागल्याने वीजपुरवठा खंडीत झाला, असे सांगण्यात आले. मात्र, यामुळे नागरिकांना संपूर्ण रात्र वीजेशिवाय काढावी लागली. एवढेच नाही तर, अनेक नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर आणि कामावर परिणाम झाला. 

खारघरमधील आणखी एका महिला रहिवाशाने सांगितले की, "वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे माझ्या दैनंदिन दिनचर्येवर परिणाम झाला. जेवण बनवताना मला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. त्याचा परिणाम मुलांवरही झाला आहे. गेल्या ३-४ दिवसांपासून ही समस्या सतत सुरू आहे. शॉर्ट सर्किटमुळे वीजपुरवठा खंडीत करण्यात आल्याचे मला समजले आहे."

Web Title: Navi Mumbai: Kharghar Under Darkness For 18 Hours Due To Power Outage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.