शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
3
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
4
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
5
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
6
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
7
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
8
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
9
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
10
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
11
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
12
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
13
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
14
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
15
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
16
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
17
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
18
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
19
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
20
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
Daily Top 2Weekly Top 5

आंतरराष्ट्रीय विमानतळाची डेडलाइन हुकणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 01:00 IST

देशाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणाºया नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची डेडलाइन हुकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

कमलाकर कांबळेनवी मुंबई : देशाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणाºया नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची डेडलाइन हुकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे नवी मुंबई विमानतळावरून २०२०मध्ये विमानाचे पहिले उड्डाण होईल, असा अंदाज वर्तविला जात आहे. सिडकोच्या वरिष्ठ सूत्राने त्यास दुजोरा दिला आहे.नवी मुंबई विमानतळाला २०१० मध्ये वन आणि पर्यावरण विभागाची पहिली परवानगी प्राप्त झाली. त्यानंतर विमानतळ उभारणीच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या. २०१५ मध्ये विमानतळावरून विमानाचे पहिले उड्डाण होईल, असे जाहीर करण्यात आले होते; परंतु भूसंपादन प्रक्रिया आणि अत्यावश्यक परवानग्या मिळविण्यास विलंब झाल्याने हा प्रकल्प रखडला. मागील आठ वर्षांपासून विविध कारणांमुळे विमानतळाचे काम रखडले आहे. २०१४ मध्ये केंद्रात व राज्यात भाजपाचे सरकार सत्तारूढ झाल्यानंतर रखडलेल्या या प्रकल्पाला गती देण्यात आली. २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुका डोळ्यासमोर ठेवून नवी मुंबई विमानतळावरून विमानाचे पहिले टेकआॅफ डिसेंबर २०१९ मध्येच होईल, असे केंद्र व राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आले होते; परंतु प्रकल्पाच्या कामाची सध्याची स्थिती पाहता ही डेडलाइन हुकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.प्रकल्पाला आवश्यक असलेल्या भूसंपादनाचा प्रश्न निकाली निघाला आहे. प्रकल्पामुळे बाधित होणाºया प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे. विमानतळाच्या गाभा क्षेत्रात येणाºया दहा गावांच्या स्थलांतराचा प्रश्न काहीसा जटील बनला आहे. येथील ग्रामस्थांनी स्थलांतराची तयारी दर्शविली आहे; परंतु प्रत्यक्ष प्रक्रिया सुरू झालेली नाही. तसेच सहा महिन्यांपूर्वी सिडकोने विमानतळपूर्व कामांना सुरुवात केली आहे. या कामांसाठी १८ महिन्यांचा कालावधी लागणार आहे. यात उलवे टेकडीची उंची कमी करणे, नदीचे पात्र बदलणे, जमिनीचे सपाटीकरण, उच्च दाबाच्या विद्युतवाहिन्या भूमिगत करणे आदी कामांचा समावेश आहे; परंतु पहिल्या सहा महिन्यांत विविध कारणांमुळे ही कामे प्राथमिक स्थितीतच आहेत. विमानतळपूर्व कामे पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष विमानतळाची उभारणी करण्यासाठी दीड वर्षाचा कालावधी लागणार आहे. या कामासाठी जी.व्ही.के. कंपनीची निविदा पात्र ठरली आहे. त्यावर राज्य मंत्रिमंडळाची अंतिम मोहोर लागणे आवश्यक आहे. सध्या हा प्रस्ताव राज्य सरकारकडे पडून आहे. एकूणच विमानतळपूर्व कामांची कासवगती व गाभा क्षेत्रातील गावांच्या स्थलांतराबाबत ग्रामस्थांचा नकारात्मक सूर यामुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून विमानाच्या टेकआॅफची डेडलाइन हुकण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.दुसºया टप्प्याच्या परवानगीला विलंबनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला वने व पर्यावरण विभागाची पहिल्या टप्प्याची परवानगी १७ नोव्हेंबर २०१०मध्ये मिळाली; परंतु दुसºया टप्प्याच्या परवानगीसाठी चक्क २०१७ उजाडले.सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांनी दिल्लीत तळ ठोकून सहा महिन्यांपूर्वी ही परवानगी मिळवून घेतली.त्यानंतर २००० कोटी रुपये खर्चाच्या विमानतळपूर्व कामांच्या वर्कआॅर्डर काढण्यात आल्या.मागील सात वर्षांत सिडकोने या प्रकल्पासाठी केंद्राकडून पाच महत्त्वपूर्ण परवानग्या मिळविल्या आहेत.