Navi Mumbai: अल्पवयीन पीडितेच्या कुटुंबाला भाजप पदाधिकाऱ्याची धमकी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 14:23 IST2025-11-20T14:20:47+5:302025-11-20T14:23:35+5:30
अल्पवयीन मुलीला व तिच्या कुटुंबीयांना धमकावल्याप्रकरणी भाजपचा अल्पसंख्याक पदाधिकारी व कथित कार्यकर्ता बॉबी शेख व त्याच्या मुलावर गुन्हा दाखल झाला आहे.

Navi Mumbai: अल्पवयीन पीडितेच्या कुटुंबाला भाजप पदाधिकाऱ्याची धमकी!
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : अल्पवयीन मुलीला व तिच्या कुटुंबीयांना धमकावल्याप्रकरणी भाजपचा अल्पसंख्याक पदाधिकारी व कथित कार्यकर्ता बॉबी शेख व त्याच्या मुलावर गुन्हा दाखल झाला आहे. मुलीचा पाठलाग करून धमकावल्याप्रकरणी कार्यकर्त्याच्या मुलाची तक्रार करण्यात आली होती. मुलाची पोलिसांकडे तक्रार का केली, याचा जाब विचारत कार्यकर्त्याने पीडित मुलीच्या घरी जाऊन कुटुंबीयांना धमकावले. या प्रकरणात आधी मुलावर नंतर वडिलांवर गुन्हा दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले.
याप्रकरणी वाशी पोलिस ठाण्यात २१ वर्षीय दोन विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल आहे. त्यापैकी एक आरोपी हा भाजपच्या अल्पसंख्याक सेलचे पदाधिकारी बॉबी शेख यांचा मुलगा आहे. त्यामुळे आपल्या मुलाविरोधात पोलिसांकडे तक्रार का केली, याचा जाब विचारण्यासाठी त्यांनी थेट पीडित मुलीच्या घरी जाऊन त्यांना धमकावले. याप्रकरणी पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी केलेल्या तक्रारीवरून कोपरखैरणे पोलिस ठाण्यात बॉबी शेख गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेख यांच्याकडून आपण भाजपच्या अल्पसंख्याक सेलचे प्रदेश पदाधिकारी असल्याचे सांगितले जाते. मात्र, त्यांच्याकडील पदाची नवी मुंबईच्या भाजप पदाधिकाऱ्यांकडून पुष्टी होऊ शकली नाही; परंतु त्याला वरिष्ठांकडून नवी मुंबईत पद दिले जात असताना त्यांच्या कार्यपद्धतीची कल्पना देऊन काही सुज्ञ पदाधिकाऱ्यांनी पक्षहित जपल्याचीही चर्चा राजकीय
वर्तुळात आहे.