शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
3
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
4
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
5
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
6
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
7
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
8
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
9
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
10
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
11
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
12
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
14
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
15
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
16
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
17
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
18
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
19
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
20
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबई विमानतळ उभे राहणार कमळाच्या आकारात; झहा हदीद यांची रचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2021 07:53 IST

मुंबई विमानतळावरील भार हलका करण्यासाठी नवी मुंबईत विमानतळ उभारण्याची योजना आखण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : नामांतराच्या वादावरून राजकारणाचा केंद्रबिंदू बनलेले नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सध्या एका वेगळ्या विषयामुळे चर्चेत आले आहे. ते म्हणजे या विमानतळाची रचना. ‘जीव्हीके’ समूहाने प्रसिद्ध केलेल्या अधिकृत व्हिडिओ आराखड्यानुसार नवी मुंबई विमानतळाची रचना कमळाच्या आकारात केली जाणार आहे. ब्रिटिश वास्तुरचनाकार कंपनी झहा हदीदने त्याची डिझाइन तयार केली आहे.

मुंबई विमानतळावरील भार हलका करण्यासाठी नवी मुंबईत विमानतळ उभारण्याची योजना आखण्यात आली आहे. त्यामुळे या विमानतळाची रचना कशी असेल, याची उत्सुकता प्रत्येकाला होती. आराखड्यानुसार कमळाच्या आकारात उभारण्यात येणाऱ्या या विमानतळामध्ये एकमेकांशी जोडलेले ३ टर्मिनल असतील. मध्यावर सेंट्रल टर्मिनल कॉम्प्लेक्स तयार केले जाईल. या विमानतळाला पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही दिशांना प्रवेशद्वार असणार आहे. पश्चिमेकडून प्रवासी वाहतूक, तर पूर्वेकडून हवाई मालवाहतूक होईल. दोन समांतर धावपट्ट्यांमुळे उड्डाणांचे संचलन करण्यात अडथळे येणार नाहीत, अशी माहिती देण्यात आली.

हे हरित विमानतळ चार टप्प्यांत उभारले जाणार आहे. पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यानंतर येथून प्रतिवर्षी ९ कोटी प्रवाशांना सेवा देता येईल. या विमानतळावर ८८ चेक इन पॉइंट्स, २६ इमिग्रेशन डेस्क, २९ एरोब्रिज असतील. चालू आर्थिक वर्षात या विमानतळाचा पहिला टप्पा सुरू करण्याचे नियोजन होते; परंतु कोरोनाकाळात कामावर परिणाम झाल्याने मुहूर्त हुकण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली.

रस्ते आणि रेल्वेमार्गाशी जोडणीnप्रवाशांना विमानतळावर पोहोचण्यात अडचणी येऊ नयेत यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.nविमानतळाला द्रुतगती मार्ग, उपनगरीय रेल्वे आणि जलवाहतुकीशी थेट जोडता यावे, यादृष्टीने विशेष व्यवस्था केली जाईल. nयेथे ९९ मार्गांचे मध्यवर्ती रेल्वे टर्मिनस उभारण्याचे नियोजन आहे.nविमानतळ पूण क्षमतेने कार्यान्वित झाल्यानंतर येथून प्रतिवर्षी ९ कोटी प्रवाशांना सेवा देणे शक्य हाेणार आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईAirportविमानतळ