शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबईत दोन मतदारसंघातून ६७ जणांनी घेतले अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2019 03:16 IST

ऐरोली व बेलापूर दोन्ही मतदारसंघातून ६७ उमेदवारांनी तब्बल १२० उमेदवारी अर्ज घेतले आहेत.

नवी मुंबई : ऐरोली व बेलापूर दोन्ही मतदारसंघातून ६७ उमेदवारांनी तब्बल १२० उमेदवारी अर्ज घेतले आहेत. मंगळवारी बेलापूर मतदारसंघातील दोघांनी अर्ज भरले आहेत. अद्याप एकही प्रमुख उमेदवाराचा अर्ज दाखल झाला नसून बंडखोरी टाळण्यासाठी शेवटच्या दोन दिवसांत अर्ज दाखल केले जाणार आहेत.नवी मुंबईमधील दोन्ही मतदारसंघामध्ये अद्याप सर्व पक्षांचे उमेदवार जाहीर झालेले नाहीत. सर्व प्रमुख पक्षाच्या नेत्यांसह अपक्ष उमेदवारांनीही मोठ्या प्रमाणात अर्ज घेतले आहेत. बेलापूरमधून भाजपच्या मंदा म्हात्रे, गणेश नाईक, शिवसेनेचे विजय नाहटा, राष्ट्रवादी काँगे्रसचे अशोक गावडे, यांच्यासह तब्बल ३४ जणांनी ६१ अर्ज घेतले आहेत. ही संख्या अजून वाढण्याची शक्यता आहे. मंगळवारी युवा जनकल्याण पक्षाचे अजयकुमार उपाध्याय व अपक्ष उमेदवार संतोष कांबळे या दोघांनी अर्ज भरला आहे. राष्ट्रवादी काँगे्रस व भाजपचे उमेदवार गुरुवारी अर्ज भरणार आहेत. शिवसेनेचे बंडखोर उमेदवार अर्ज भरणार का, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.ऐरोली मतदारसंघातून ३३ उमेदवारांनी ५९ अर्ज घेतले आहेत. भाजपच्या वतीने संदीप नाईक यांनी उमेदवारी अर्ज घेतला आहे. शिवसेनेच्याही काही पदाधिकाऱ्यांनी अर्ज घेऊन ठेवले आहेत. भाजपचा उमेदवार निश्चित झाला असून विरोधात राष्ट्रवादी काँगे्रसचा उमेदवार अद्याप निश्चित झालेला नाही. गुरुवारी व शुक्रवारी प्रमुख पक्षांचे उमेदवार अर्ज सादर करणार आहेत. बंडखोरी टाळण्यासाठी प्रमुख पक्षाचे उमदेवार शेवटच्या दोन दिवसांत अर्ज भरणार आहेत.प्रमुख पक्षाच्या नेत्यांसह अपक्ष उमेदवारांनीही मोठ्या प्रमाणात अर्ज घेतले आहेत. गुरुवारी राष्टÑवादी काँग्रेस व भाजपच्या उमेदवारांकडून अर्ज भरले जाण्याची शक्यता आहे.पनवेलमध्ये दोन उमेदवारी अर्ज दाखलपनवेल : १८८ पनवेल विधानसभा मतदारसंघात मंगळवारी दोन उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. अपक्ष अरुण म्हात्रे व बहुजन समाज पक्षाचे फुलचंद किटके यांनी हे उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.पनवेल विधानसभा मतदारसंघातून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांमार्फत २८ नामनिर्देशित अर्जाचे वाटप करण्यात आले आहे. ४ आॅक्टोबर अर्ज भरण्याची अंतिम तारीख आहे. अर्ज भरण्यासाठी तीन दिवस शिल्लक असल्याने पुढील तीन दिवसांत मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे.पनवेलमध्ये शेकाप विरुद्ध भाजप अशी लढत रंगणार आहे. भाजपच्या वतीने विद्यमान आमदार प्रशांत ठाकूर तर शेकापच्या वतीने नगरसेवक हरेश केणी यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे. शिवसेनेची भाजपसोबत युती असल्याने शिवसैनिकांना प्रशांत ठाकूर यांचा प्रचार करावा लागणार आहे. तर काँग्रेस, राष्ट्रवादी सोबत शेकापची आघाडी असल्याने दोन्ही काँग्रेस शेकापसोबत असणार आहेत. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019