शहरं
Join us  
Trending Stories
1
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
2
"लाचारीच्या सर्व मर्यादा सोडल्या"; जिरेटोप प्रकरणावरून शरद पवारांनी प्रफुल्ल पटेलांना फटकारलं!
3
महिन्याभरात २६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या; जयंत पाटलांनी सरकारला धारेवर धरलं
4
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
5
"महिलांच्या कमावण्याच्या नादात वाढतंय घटस्फोटाचं प्रमाण"; सईद अन्वरचं वादग्रस्त विधान! VIDEO व्हायरल
6
संजय राऊतांच्या आरोपानंतर मुख्यमंत्र्यांच्या बॅगा तपासल्या; नाशिकमध्ये काय घडलं?
7
Adani Group : अदानींच्या 'या' कंपनीला मोठा झटका, नॉर्वेच्या सर्वात मोठ्या वेल्थ फंडानं केलं ब्लॅकलिस्ट
8
मनोज जरांगे पाटील यांची ८ जून रोजी होणारी सभा रद्द, या दोन कारणांमुळे घेतला निर्णय
9
बाळासाहेबांवर टीका करणाऱ्या अंधारेंना पक्षात का घेतलं?, CM विरोधात लढणार का?; आदित्य ठाकरेंची रोखठोक उत्तरं
10
Fact Check: Video - मुंबईत भाजपाच्या किटमध्ये सोन्याची बिस्किटं सापडली?; जाणून घ्या, 'सत्य'
11
...तर ईडी आरोपीला पीएमएलए कायद्यानुसार अटक करू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाची महत्वाची टिप्पणी
12
गाडी चालविताना मोबाईल काय साधा कागद जरी हातात जरी पकडला तरी दंड; जाणून घ्या वाहतुकीचा नियम...
13
अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
14
Post Officeच्या 'या' स्कीममध्ये PM Modiनी देखील केलीये ९ लाखांची गुंतवणूक, तुम्हालाही मिळेल उत्तम रिटर्न
15
'ड्रग्स पासून दूर राहा', शुभांगी गोखलेंनी लेकीला हात जोडून सांगितलं; ती लंडनला गेल्यावर...
16
कांद्यावरून पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारणाऱ्या तरुणाचा मला अभिमान, शरद पवारांचं मोठं विधान
17
ना पाकिस्तान, ना ऑस्ट्रेलिया! ब्रायन लाराने जाहीर केले T20 World Cup चे ४ सेमीफायनलिस्ट
18
दोन्ही पायांनी दिव्यांग, जिद्द नाही सोडली; स्वत:चा जीव धोक्यात घालून वाचवला हजारो लोकांचा जीव
19
विराट कोहली केव्हा करणार क्रिकेटला 'अलविदा'? रिटायरमेंटच्या प्रश्नावर स्पष्टच बोलला!
20
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका

महापालिका सज्ज : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी 12 हजार बेड्सचे व्यवस्थापन, आयसीयू युनिटची क्षमता १५०० पर्यंत वाढविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 10:24 AM

तिसरी लाट लहान मुलांसाठी धोकादायक ठरू शकते. यामुळे दोन ते तीन ठिकाणी फक्त लहान मुलांसाठी सर्वसाधारण, ऑक्सिजन, आयसीयू, पिडियाट्रिक, व्हेंटिलेटर्स व्यवस्था असलेले कोविड सेंटर उभारण्यात येणार आहे.

नवी मुंबई : कोरोनाची तिसरी लाट ऑगस्ट, सप्टेंबर मध्ये येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या लाटेत जास्तीत जास्त रुग्ण संख्या २५ हजारपर्यंत जाण्याची शक्यता आहे. या लाटेशी मुकाबला करण्यासाठी महानगरपालिकेने तयारी सुरू केली आहे. शहरात १२ हजार बेड उपलब्ध केले जाणार आहेत. ऑक्सिजन बेडची संख्या ५ हजारपर्यंत व आयसीयू युनिटची क्षमता १५०० पर्यंत वाढविण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.            नवी मुंबईमध्ये कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागली आहे. १४ एप्रिलला सक्रिय रुग्णांची संख्या ११६०५ पर्यंत पोहचली होती. तेव्हापासून सातत्याने रुग्ण संख्या कमी हाेत असल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळत आहे. दुसरी लाट ओसरत असली तरी ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये तिसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ही लाट आलीच तर पुन्हा आरोग्य यंत्रणा कोलमडू नये यासाठी महानगरपालिकेने तयारी सुरू केली आहे. आयुक्त अभिजित बांगर यांनी बुधवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन चर्चा केली. 

तिसरी लाट आलीच तर शहरात जास्तीत जास्त रुग्ण संख्या २५ हजार पर्यंत पोहचू शकते. यामधील ५० टक्के रुग्ण रुग्णालयात दाखल होतील हे गृहीत धरुन १२ हजार बेड्सची तयारी आतापासूनच करण्यासाठी सुरुवात केली आहे. दुसऱ्या लाटेत आयसीयू व व्हेंटिलेटर्स बेडची संख्या कमी पडली होती. सद्य:स्थितीमध्ये शहरात ३ हजार ऑक्सिजन बेड आहेत. त्यामध्ये अजून २ हजार बेडची भर टाकून ५ हजार बेड्स उपलब्ध केले जाणार आहेत. शहरात ४ हजार सर्वसाधारण बेड्स आहेत. त्यामध्ये अजून ४ हजार बेडची वाढ करण्यात येणार आहे.तिसरी लाट लहान मुलांसाठी धोकादायक ठरू शकते. यामुळे दोन ते तीन ठिकाणी फक्त लहान मुलांसाठी सर्वसाधारण, ऑक्सिजन, आयसीयू, पिडियाट्रिक, व्हेंटिलेटर्स व्यवस्था असलेले कोविड सेंटर उभारण्यात येणार आहे. त्या ठिकाणी आई-वडिलाना केअर टेकर म्हणून राहता येईल, अशी व्यवस्था केली जाणार आहे. बेड उपलब्धतेप्रमाणे मनुष्यबळाचेही नियोजन करावे लागणार आहे. यासाठी विद्यमान कर्मचाऱ्यांना विशेषत: नर्सेसना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

तीन ऑक्सिजन प्रकल्प उभारणारमहानगरपालिकेने वाशीतील सिडको प्रदर्शन केंद्रामध्ये ऑक्सिजन प्रकल्प उभारण्याची कार्यवाही सुरू केली आहे. मे अखेरपर्यंत तो प्रकल्प सुरू होईल. या व्यतिरिक्त आणखी दोन प्रकल्प उभारण्याचे नियोजन करण्यात येत आहे. यासाठीची कार्यवाही लवकरच सुरू केली जाणार आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसOxygen Cylinderऑक्सिजनhospitalहॉस्पिटलdocterडॉक्टरCorona vaccineकोरोनाची लस