शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
3
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
4
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
5
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
6
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
7
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
8
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
9
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
10
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
11
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
12
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
13
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
14
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
15
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
16
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
17
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
18
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
19
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
20
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी २६३ अर्ज दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2020 05:00 IST

संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या बाजार समिती निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत बुधवारी संपली आहे.

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी शेवटच्या दिवसापर्यंत तब्बल २६३ जणांनी अर्ज दाखल केले आहेत. माथाडीनेते शशिकांत शिंदे यांच्याविरोधात एकही अर्ज दाखल झाला नसल्याने त्यांची निवड बिनविरोध होणार आहे. दाखल केलेल्या अर्जांची गुरुवारी बाजार समितीमध्ये छाननी केली जाणार आहे.संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या बाजार समिती निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत बुधवारी संपली आहे. शेवटच्या दिवशी जवळपास ८२ जणांनी अर्ज दाखल केला आहे. ४३४ जणांनी अर्ज विकत घेतले होते. त्यापैकी तब्बल २६३ जणांनी अर्ज दाखल केले आहेत. राज्याच्या सहाही महसूल विभागामधून शेतकरी प्रतिनिधी अर्ज भरण्यासाठी चार दिवसांपासून मुंबईमध्ये येत होते. अर्ज भरण्याची प्रक्रिया सुलभ व्हावी, यासाठी बाजार समितीच्या चौथ्या मजल्यावर विशेष व्यवस्था करण्यात आली होती. प्रत्येक मतदारसंघनिहाय अर्ज भरण्यासाठी स्वतंत्र टेबल ठेवण्यात आले होते.बाजार समिती निवडणुकीमध्ये कामगार प्रतिनिधीसाठी माथाडीनेते शशिकांत शिंदे यांनी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या विरोधात कोण अर्ज भरणार याविषयी उत्सुकता प्रत्येकात निर्माण झाली होती. माथाडी संघटना एकच उमेदवार देणार की कामगारांमध्ये फूट पडून दुसरा उमेदवारही उभा राहणार, याविषयी उत्सुकता निर्माण झाली होती; परंतु शेवटच्या दिवसापर्यंत कोणीच अर्ज भरला नसल्यामुळे शशिकांत शिंदे यांची निवड बिनविरोध होणार असल्याचे निश्चित झाले आहे.छाननीसाठी विशेष व्यवस्थाबाजारसमिती निवडणुकीसाठी सादर केलेल्या अर्जांची गुरुवारी सकाळी ११ वाजल्यापासून छाननी सुरू केली जाणार आहे. छाननीसाठी सर्व उमेदवार व सूचकांनाही उपस्थित राहवे लागणार आहे. जवळपास ५५० नागरिक छाननीदरम्यान उपस्थित राहण्याची शक्यता आहे. कोणाचीही गैरसोय होऊ नये, यासाठी बाजार समिती मुख्यालयाच्या समोर तंबू टाकण्यात आला आहे. चौथ्या मजल्यावर छाननीसाठीही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई