शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

घंटागाडी कामगारांचे आंदोलन

By admin | Updated: October 10, 2015 00:26 IST

पनवेल शहरातील कचरा उचलणाऱ्या घंटागाडी कामगारांना ठेकेदारांकडून वेळेत पगार दिला जात नाही. त्याचबरोबर इतर सुविधा पुरविल्या जात नसल्याने शुक्र वारी कामगारांनी काम

कळंबोली : पनवेल शहरातील कचरा उचलणाऱ्या घंटागाडी कामगारांना ठेकेदारांकडून वेळेत पगार दिला जात नाही. त्याचबरोबर इतर सुविधा पुरविल्या जात नसल्याने शुक्र वारी कामगारांनी काम बंद आंदोलन केले. त्यामुळे अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले होते. शहरात साथीच्या आजाराने थैमान घातले. त्यातच ठिकठिकाणी साचलेल्या कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून आजार आणखी बळावण्याची शक्यता नागरिकांकडून वर्तवण्यात येत आहे.शहरातील कचरा उचलण्याचे काम समीक्षा कन्स्ट्रक्शन या कंपनीला देण्यात आले आहे. यासाठी प्रति टन १२५0 रुपये पालिकेकडून एजन्सीला देण्यात येतात. कॉम्पॅक्टरच्या सहाय्याने अथवा घंटागाडीच्या माध्यमातून हा कचरा उचलण्यात येतो. सध्या घंटागाडीवर एकूण ६0 कामगार काम करीत असून त्यापैकी १७ जण वाहनचालक आहेत. किमान वेतनानुसार संबंधित एजन्सी वेतन देत नसल्याची तक्रार गेल्या अनेक महिन्यांपासून कामगार करीत आहेत. या व्यतिरिक्त गणवेश, गमबुुट, हँडग्लोज, मास्क, फावडे आदी सुरक्षेच्या दृष्टीने उपयुक्त साहित्य पुरवणे बंधनकारक आहे. मात्र ठेकेदाराकडून हे साहित्य पुरवण्यात येत नसल्याने कामगारांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत कामगारांच्या संघटनेकडून वारंवार तक्रार करण्यात येत असली तरी त्याकडे दुर्लक्ष होत आहे. आश्वासनांव्यतिरिक्त कामगारांना काहीच मिळत नसल्याचे संघटनेचे सचिव सतीश जिंदालिया यांनी सांगितले. त्यामुळे शुक्रवारी कामगारांनी काम बंद आंदोलन केले. शहरातील कोणत्याही भागातील कचरा उचलण्यात आला नाही. परिणामी कर्नाळा सर्कल, सिडको बसस्टॉप, मार्केट यार्ड, भाजी मार्केट या महत्त्वाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग साचले होते. जोपर्यंत वेतन जमा होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याची भूमिका कामगारांनी घेतली. त्याचबरोबर इतर सुविधाही त्वरित पुरविण्याची मागणी त्यांनी केली. घंटागाडी कामगारांना वेळेत वेतन द्यावे अशी सूचना संबंधित एजन्सीला करण्यात आली आहे. ही अत्यावश्यक सेवा असून ती खंडित होवू नये, यासाठी पालिका प्रशासनाकडून समन्वयाची भूमिका घेण्यात येत आहे. एजन्सी आािण कामगारांची बैठक घेवून कायमस्वरूपीचा तोडगा काढण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. - चारुशीला पंडित, अतिरिक्त मुख्याधिकारी, पनवेल