विदेशी तरुणीचा रेल्वेत विनयभंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2018 23:27 IST2018-09-19T23:26:05+5:302018-09-19T23:27:07+5:30

वाशी रेल्वे पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

Mistress of foreign woman in the railway | विदेशी तरुणीचा रेल्वेत विनयभंग

विदेशी तरुणीचा रेल्वेत विनयभंग

नवी मुंबई : रेल्वेतून प्रवास करणाऱ्या विदेशी तरुणीचा विनयभंग झाल्याची घटना वाशी-मानखुर्द दरम्यान घडली आहे. या प्रकरणी वाशी रेल्वे पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. सदर तरुणी रेल्वेच्या जनरल डब्यात चढली असता, तिच्यासोबत हा प्रकार घडला आहे.
फिनलँड येथून मुंबईच्या टाटा इन्स्टिट्यूट आॅफ सोशल सायन्समध्ये शिक्षणासाठी आलेल्या तरुणीसोबत हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी सोमवारी रात्री वाशी रेल्वे पोलीसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर तरुणी तिच्या दोन मैत्रिणींसह गोवंडीच्या दिशेने जात असताना विदेशी तरुणी व तिची मैत्रीण घाईमध्ये महिलांच्या डब्याऐवजी वेगवेगळ्या साधारण डब्यात चढल्या होत्या.

Web Title: Mistress of foreign woman in the railway