Maratha Morcha Mumbai: मनोज जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी आंदोलकाने रेडा घेऊन गाठली मुंबई
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2025 18:01 IST2025-08-30T17:59:19+5:302025-08-30T18:01:30+5:30
मुंबईत मनोज जरांगे यांनी सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी एक व्यक्ती चक्क स्वतःचा रेडा घेऊन आला आहे. नवी मुंबईत मराठा समर्थक थांबलेला असून, परवानगी मिळाल्यास रेडा घेऊन मुंबईत जाणार आहे.

Maratha Morcha Mumbai: मनोज जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी आंदोलकाने रेडा घेऊन गाठली मुंबई
नामदेव मोरे, नवी मुंबई
Maratha Reservation News: मराठा आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील बार्शीवरून एका शेतकरी रेडा घेऊन आला आहे. सादिक तांबोळी असे रेडा घेऊन नवी मुंबईत दाखल झालेल्या आंदोलक समर्थकांचे नाव आहे. 'हा लढा गोरगरीब शेतकऱ्यांचा आहे. यास पाळीव पशू पक्षांचाही पाठिंबा दर्शविण्यासाठी रेडा घेऊन आलो', असे सादीक यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मागच्या वेळी नवी मुंबईतील वाशीतून परलेल्या मनोज जरांगेंनी यावेळी मुंबईत धडक दिली. मुंबईतील आझाद मैदानात उपोषण सुरू केले. २९ ऑगस्टपासून सुरू झालेल्या या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून लोक येत आहेत. त्यामुळे मुंबईत सगळीकडे गर्दी झाली आहे. मराठा आरक्षण समर्थकांचे जत्थेच्या जत्थे मुंबई, नवी मुंबईत येऊन धडकत आहेत. सादिक तांबोळीही जरांगेंच्या मागण्यांना पाठिंबा देण्यासाठी बार्शीवरून आले आहेत.
नवी मुंबईत रेडा घेऊन थांबले
नवी मुंबईतील सिडको प्रदर्शन केंद्राजवळ थांबलेला रेडा आंदोलनात सहभागी झालेल्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. सादिक तांबोळी यांनी सांगितले की, 'मनोज जरांगे पाटील तळमळीने व प्रामाणिकपणे संघर्ष करत आहेत. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आलो आहे. परवानगी घेऊन आझाद मैदानावर ही जायचे आहे', असे ते म्हणाले.
मराठा आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील बार्शीवरून एका शेतकरी रेडा घेऊन आला आहे. सादिक तांबोळी असे रेडा घेऊन नवी मुंबईत दाखल झालेल्या आंदोलक समर्थकांचे नाव आहे.
— Lokmat (@lokmat) August 30, 2025
🎥नामदेव मोरे#MarathaInMumbai#MarathaArakshan#MarathaReservationProtestpic.twitter.com/QN4he32zJk
'आरक्षणाला विरोध करणाऱ्यांबद्दल सादिक यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, 'विरोध नको पाठिंबा द्या. गोरगरिबांना आरक्षणाचा लाभ होऊ द्या. शेतकऱ्यांचा लढा आहे. शेतीला सहाय्य करणाऱ्या पशूपक्षांचाही लढ्यास पाठिंबा असल्याचे दाखवण्यासाठी हा रेडा घेऊन आलो आहे', असे तांबोळी म्हणाले.