शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
3
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
4
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
5
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
6
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
7
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
8
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
9
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
10
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
11
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
12
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
13
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
14
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
15
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
16
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
17
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
18
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
19
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
20
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
Daily Top 2Weekly Top 5

पनवेलमध्ये महिलाराज

By admin | Updated: July 7, 2017 06:46 IST

प्रथम महापौर व उपमहापौर कोण होणार? याविषयी पनवेलकरांना ४० दिवसांपासून लागलेली उत्सुकता अखेर गुरुवारी संपली

लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : प्रथम महापौर व उपमहापौर कोण होणार? याविषयी पनवेलकरांना ४० दिवसांपासून लागलेली उत्सुकता अखेर गुरुवारी संपली. दोन्ही पदांवर महिला विराजमान होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. व्यवसायाने डॉक्टर असलेल्या कविता चौतमल शहराच्या प्रथम नागरिक होणार आहेत. राज्यातील पहिल्या नगरपालिकेच्या शेवटच्या नगराध्यक्षा असलेल्या चारुशीला घरत यांची उपमहापौरपदी वर्णी लागणार आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिश सरकारने भारतामधील शहरांचे व्यवस्थापन पाहण्यासाठी नगरपालिका कायदा तयार केला. पनवेल ही या कायद्याअंतर्गत राज्यात स्थापन झालेली पहिली नगरपालिका. पूर्ण तालुक्याचे शहरीकरण झाल्यामुळे शासनाने नगरपालिका व सिडको विकसित नोड व ग्रामपंचायती मिळून महापालिकेची स्थापना केली. भविष्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळ व नैना, मेट्रो सारखे प्रकल्प परिसरामध्ये असल्याने महापालिकेला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. पहिल्याच निवडणुकीमध्ये भाजपाने स्पष्ट बहुमत मिळविल्यानंतर महापौर व उपमहापौरपदावर कोणाची वर्णी लागणार? याविषयी उत्सुकता लागून राहिली होती. महापालिकेच्या विकासाची पायाभरणी करण्याची जबाबदारी नवीन पदाधिकाऱ्यांवर असल्याने त्यांची निवड करताना भाजपा नेतृत्वासमोर आव्हान होते. महापौरपद अनुसूचित जातींमधील महिला प्रवर्गासाठी राखीव होते. भाजपाकडे चार नगरसेविकांचा पर्याय होता. यामध्ये कविता चौतमल यांची निवड करण्यात आली आहे. नवीन पनवेलमधील नागरिक ठाकूर कुटुंबीयांच्या पाठीशी नेहमीच ठामपणे उभे राहिले आहेत. यामुळेच प्रशांत ठाकूर व स्थानिक नेते संतोष शेट्टी यांचे जवळचे कार्यकर्ते असणाऱ्या किशोर चौतमल यांच्या पत्नीला महापौरपदाची उमेदवारी दिली आहे. महापालिकेचे उपमहापौर खुल्या प्रवर्गासाठी असतानाही भाजपाने महिलेलाच त्या पदावर संधी दिली आहे. नगरपालिकेच्या शेवटच्या नगराध्यक्षा असलेल्या चारुशीला घरत यांची निवड करण्यात आली आहे. घरत यांनी पाच वर्षे नगरपालिकेचा कारभार अत्यंत पारदर्शकपणे चालविला होता. त्यांनी आतापर्यंत शहराच्या विकासासाठी केलेल्या कामाची पोचपावती म्हणून त्यांची निवड करण्यात आली आहे. त्यांना सभागृहाचे कामकाज चालविण्याचा व प्रशासनाचा अनुभव असल्याने त्याचा लाभ करून घेण्यासाठी पक्षाने हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.नावउमेदवारीपक्षशिक्षणसंपत्ती डॉ. कविता किशोर चौतमलमहापौरभाजपावैद्यकीय पदवी१५ लाख ३३ हजार हेमलता रवि गोवारीमहापौरशेकाप१२वी १ कोटी ४१ लाख चारूशीला कमलाकर घरतउपमहापौर भाजपाडी.एड.६६ लाख रवींद्र अनंत भगतउपमहापौर शेकापनववी२ कोटी ३४ लाख