शहरं
Join us  
Trending Stories
1
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
2
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
3
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
4
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
5
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
6
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
7
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
8
सत्ता मिळविण्यासाठी उद्धवसेनेने प्रतिष्ठा घालविली; मुख्यमंत्री शिंदेंची घणाघाती टीका
9
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
10
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
11
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
12
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
13
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
14
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
15
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
16
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
17
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती
18
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
19
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
20
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील

Vidhan Sabha 2019: बेलापूरमध्ये आता तिकिटासाठी रस्सीखेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 11:17 PM

भाजपसमोर पेच; युतीच्या वाटाघाटीवर सेनेच्या उमेदवारीचे भवितव्य

- कमलाकर कांबळे नवी मुंबई : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जारी झाली आहे. त्यानुसार सर्वच मतदारसंघांत इच्छुकांची लगबग सुरू झाली आहे. भाजपच्या विद्यामान आमदार मंदा म्हात्रे यांनी या जागेवर आपला प्रबळ दावा केला आहे. तर अलीकडेच राष्ट्रवादीतून भाजपात दाखल झालेले माजी मंत्री गणेश नाईक यांच्या नावाचीही जोरदार चर्चा आहे. त्यामुळे तिकीट वाटपाचा हा घोळ मिटविताना भाजपची कसरत होणार आहे.विधानसभेच्या २0१४ मधील निवडणुकीत नाईक यांचा पराभव करून मंदा म्हात्रे जायंट किलर ठरल्या होत्या. निवडणुकीच्या ऐन तोंडावर राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन म्हात्रे यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढविली होती. तर शिवसेनेने विजय नाहटा यांना रिंगणात उतरविले होते. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची झाली होती. यात मोदी लाटेचा करिष्मा मंदा म्हात्रे यांच्या पथ्यावर पडल्याने त्या अवघ्या दोन हजार मतांच्या फरकाने विजयी झाल्या. आमदार म्हणून त्यांनी पाच वर्षांत विविध कामांची पूर्तता केली. मतदारसंघात अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांना चालना दिली. प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांवर विधानसभेत चर्चा घडवून आणली. मतदारसंघातील जनसंपर्क कायम ठेवला. त्यामुळेच पक्षाकडून यावेळीसुद्धा आपणालाच संधी मिळेल, असा विश्वास त्यांना वाटतो आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीतून भाजपात दाखल झालेले गणेश नाईक यांनीसुद्धा बेलापूरमधून निवडणूक लढण्याची तयारी सुरू केली आहे. त्यांनी स्वत:हून तसे संकेत दिले नसले तरी त्यांच्या समर्थकांकडून मात्र बेलापूरमधून त्यांचीच उमेदवारी निश्चित मानली जात आहे. तशा अशयाच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केल्या जात आहेत. गणेश नाईक हे राज्यातील वजनदार नेते आहेत. तसेच त्यांच्या पक्षांतरामुळे नवी मुंबई महापालिकेवर भाजपची सत्ता स्थापन होणार आहे. शिवाय त्यांचा प्रदीर्घ अनुभवाचा फायदा ठाणे जिल्ह्यात भाजपचा विस्तार करण्यासाठी होणार आहे. तर मंदा म्हात्रे या विद्यमान आमदार आहेत. त्यांच्या कामाचा आलेखही चांगला आहे. अशा परिस्थितीत भाजपकडून तिकीट वाटपात कोणाला झुकते माप मिळते, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Shiv SenaशिवसेनाBJPभाजपा