मुरूडमध्ये महाआघाडीच्या प्रचार रॅलीस प्रतिसाद

By Admin | Updated: November 18, 2016 03:26 IST2016-11-18T03:26:26+5:302016-11-18T03:26:26+5:30

मुरुड नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी, शेकाप व काँग्रेस आय पक्षाची महाआघाडी झाली असून

Magnificent publicity rally response in Murud | मुरूडमध्ये महाआघाडीच्या प्रचार रॅलीस प्रतिसाद

मुरूडमध्ये महाआघाडीच्या प्रचार रॅलीस प्रतिसाद

नांदगाव/ मुरुड : मुरुड नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी, शेकाप व काँग्रेस आय पक्षाची महाआघाडी झाली असून नुकत्याच काढलेल्या प्रचार रॅलीस मोठा प्रतिसाद लाभला आहे. या तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी शेकडोच्या संख्येने रस्त्यावर उतरून मोठ्या प्रमाणात ही प्रचार रॅली काढली. या प्रचार रॅलीत राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष मंगेश दांडेकर, मुरुड तालुका शेतकरी कामगार पक्षाचे चिटणीस मनोज भगत, नाना गुरव, विश्वास चव्हाण, मनोहर बैले, मनोहर मकू, नगराध्यक्षपदाच्या उमेदवार मुग्धा दांडेकर, बाबा दांडेकर आदींसह असंख्य कार्यकर्ते शेकडोच्या संख्येने उपस्थित होते. सदरच्या रॅलीव्दारे बाजारपेठ, कालभैरव मंदिर, गणेश पाखाडी आदी भागांतून प्रचार करण्यात येऊन आपल्याच आघाडीच्या उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले.
या वेळी तालुका चिटणीस मनोज भगत यांनी, गेल्या पाच वर्षांत मुरु ड नगरपरिषद विभागात आमदार सुनील तटकरे यांच्या माध्यमातून अनेक विकासकामे झालेली असून लोकांचा प्रमुख पाणीप्रश्नही सुटल्याने शहरातील सर्व जनता आघाडीवर खूश असून येणाऱ्या दिवसांत नगरपरिषदेवर आघाडीची सत्ता पाहावयास मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या प्रचार रॅलीत असंख्य झेंडे फडकवून आघाडीच्या घोषणा करून वातावरण निर्मिती केली. शेकडो लोकांच्या या प्रचार रॅलीमुळे मुरु ड शहरात आघाडीचा जोर दिसून आला. (वार्ताहर)

Web Title: Magnificent publicity rally response in Murud