शहरं
Join us  
Trending Stories
1
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
2
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
3
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
4
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
5
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
6
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
7
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
8
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
9
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
10
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
11
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
12
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
13
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
14
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
15
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
16
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
17
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
19
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
20
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
Daily Top 2Weekly Top 5

‘मेट्रो’च्या दुस-या टप्प्यासाठी चाचपणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2017 02:25 IST

मेट्रोचा पहिला टप्पा दृष्टिपथात आला आहे. या प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आल्याने सिडकोने खांदेश्वर ते तळोजा या दुसºया टप्प्यातील प्रकल्पासाठी चाचपणी

- कमलाकर कांबळे 

नवी मुंबई : मेट्रोचा पहिला टप्पा दृष्टिपथात आला आहे. या प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आल्याने सिडकोने खांदेश्वर ते तळोजा या दुसºया टप्प्यातील प्रकल्पासाठी चाचपणी सुरू केली आहे. दुसरा टप्पा ८ किलोमीटर लांबीचा आहे. त्यासाठी एमआयडीसीची जमीन लागणार आहे. त्यानुसार सिडकोने एमआयडीसीबरोबर बोलणी सुरू केली आहे. पेंधरपर्यंतच्या पहिल्या टप्पा सुरू होताच दुसºया टप्प्याच्या कामाला सुरुवात करण्याचा सिडकोचा मानस आहे.सिडकोने २0११मध्ये नवी मुंबई मेट्रोच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. तीन टप्प्यांत पूर्ण होणारा हा मेट्रो प्रकल्प २१.४५ किमी लांबीचा आहे. या मार्गावर एकूण १९ स्थानके असणार आहेत. त्यापैकी बेलापूर-खारघर-तळोजा-पेंधर या ११ कि.मी. लांबीच्या पहिल्या टप्प्याचे काम प्रगतिपथावर आहे. या मार्गावर एकूण ११ स्थानके आहेत. तांत्रिक बाबीमुळे रखडलेला या पहिल्या टप्प्याचे काम सध्या प्रगतिपथावर आहे. सप्टेंबर २0१८ मध्ये या मार्गावर मेट्रो सुरू करण्याचा निर्धार सिडकोने केला आहे. त्यासाठी चिनी बनावटीच्या मेट्रो खरेदी करण्यात आल्या आहेत. त्यापैकी दोन मेट्रो पुढील महिन्यात ट्रायलसाठी सिडकोच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. एकूणच मेट्रोचा पहिला टप्पा दृष्टिपथात दिसू लागल्याने सिडकोने आता आपले लक्ष दुसºया टप्प्याच्या कामावर केंद्रित केले आहे.दुसरा टप्पा ८.३५ कि.मी. लांबीचा आहे. तळोजा एमआयडीसी-कळंबोली-खांदेश्वर मार्गे आंतरराष्ट्रीय विमानतळाला हा मार्ग जोडला जाणार आहे. विशेष म्हणजे या मार्गाच्या एकूण लांबीपैकी तीन ते चार किमीचा मार्ग एमआयडीसी क्षेत्रातून जाणार आहे. त्यासाठी एमआयडीसीकडून जमीन प्राप्त होणे गरजेचे आहे. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांनी त्यादृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत. सिडकोच्या अधिकाºयांनी गुरुवारी एमआयडीसीच्या संबंधित अधिकाºयांबरोबर यासंदर्भात चर्चा केली. लवकरच एक संयुक्त बैठक घेवून त्यावर निर्णायक चर्चा केली जाणार असल्याची माहिती सिडकोच्या सूत्राने दिली.मेट्रो प्रकल्पाचा टप्पानिहाय खर्च...1) बेलापूर ते पेंधर या ११ कि.मी. लांबीच्या पहिल्या टप्प्यासाठी सुरुवातीच्या काळात दोन हजार कोटी रुपये खर्च अंदाजित करण्यात आला होता. परंतु प्रकल्पाचे काम रखडल्याने आता या खर्चातही वाढ झाली आहे.2) ८.३५ कि.मी. लांबीच्या तळोजा एमआयडीसी-कळंबोली-खांदेश्वर मार्गासाठी दीड हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.3) पहिल्या दोन टप्प्यांना जोडण्यासाठी तिसरा टप्पा प्रस्तावित करण्यात आला आहे. हा टप्पा केवळ २ कि.मी. लांबीचा असून तो थेट आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडला जाणार आहे. सुरुवातीच्या काळात त्यासाठी ५७४ कोटी रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे.4) पहिलाच टप्पा चार वर्षे रखडल्याने उर्वरित दोन टप्प्यांचे कामही लांबणीवर पडल्याने या संपूर्ण प्रकल्पाचा खर्च चार हजार कोटींपेक्षा अधिक होण्याची शक्यता आहे.