शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

एमआयडीसीत वाहिनीला गळती

By admin | Updated: December 14, 2015 01:29 IST

धाटाव एमआयडीसीमधील सीईटीपी केंद्रातून सोडले जात असलेल्या विषारी सांडपाण्याने कुंडलिका नदीतील मासे मृत्युमुखी पडले आहेत

रोहा : धाटाव एमआयडीसीमधील सीईटीपी केंद्रातून सोडले जात असलेल्या विषारी सांडपाण्याने कुंडलिका नदीतील मासे मृत्युमुखी पडले आहेत. याबाबत तहसीलदार रोहा यांना निवेदन देण्यात आले आहे. याबाबत पंचनामे करुन नुकसानभरपाई मिळावी, अन्यथा आंदोलनाचा इशारा झोळांबे कोपरी, लक्ष्मीनगर या गावांमधील कोळी बांधवांनी दिला आहे.धाटाव एमआयडीसीमधील सांडपाणी सीईटीपी केंद्रातून प्रक्रिया करुन शुध्द करुन सोडले जात असल्याचा दावा संबंधितांकडून वारंवार केला जातो. मात्र सीईटीपी केंद्रातून प्रक्रिया केलेल्या सांडपाण्यात विषारी घटक कायम असल्याची ओरड नेहमीच होत आहे. झोळांबे कोपरे, लक्ष्मीनगर या गावांमधील कोळी बांधवांचा उदरनिर्वाह मासेमारीवर अवलंबून आहे, मात्र विषारी सांडपाण्यामुळे कुंडलिका नदीतील मासे मृत्युमुखी पडल्याने स्थानिकांनी नुकसानभरपाईची मागणी केली आहे.एमआयडीसीच्या दूषित सांडपाणी वाहून नेणाऱ्या वाहिनीला झोळांबे कोपरे गावाजवळ मोठे लिकेज असल्याने हे सांडपाणी नदीमध्ये मिसळून मासे मृत्युमुखी पडल्याचे स्थानिकांनी सांगितले आहे. या वाहिनीसाठी एमआयडीसीने काही दिवसांपूर्वीच करोडो रुपये खर्च केले आहेत. मात्र सांडपाण्याची गळती कायम असल्याने कुंडलिका नदीमधील जलचरांचे जीवन धोक्यात आले आहे. झोळांबे कोपरे, लक्ष्मीनगर या गावांमधील कोळी बांधवांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. दोन दिवसांत पंचनामे करुन नुकसानभरपाई मिळावी, अन्यथा आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.याबाबत तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनावर दिनकर चावरेकर, नंदकुमार चावरेकर, प्रवीण चोरगे, गणेश दाभाडे आदींनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. याबाबत लवकरच स्थानिक आमदारांची भेट घेणार असल्याचे संबंधितांनी सांगितले आहे. याबाबत सीईटीपीचे सप्रे यांच्याशी संपर्क साधला असता एमआयडीसीला या लाइन दुरुस्त करण्याबाबत सूचना दिल्या असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.(वार्ताहर)