शहरं
Join us  
Trending Stories
1
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
2
"बुलडोझर कुठे चालवायचा? याची ट्यूशन योगीजींकडून घ्या..."; पंतप्रधान मोदींनी या दोन पक्षांना दिला सल्ला!
3
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
4
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
5
पहिली बॅटिंग, दुसरी बॅटिंग? RCB कन्फ्युज! कसं जुळवणार Playoffs चं गणित? लै झंझट
6
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
7
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
8
"ज्या पद्धतीने पुतिन विरोधकांना..."; अरविंद केजरीवाल यांनी रशियासोबत केली भारताची तुलना!
9
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
10
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 
11
पुण्यातील तरुणाने बनवलं ChatGPT, कंपनीच्या मालकाने केलं कौतुक; म्हणाले- 'तुझ्या शिवाय...'
12
खळबळजनक! अल्पवयीन मुलीने 2 बहिणींची गळा आवळून केली हत्या; सांगितलं धक्कादायक कारण
13
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला
14
T20 World Cup साठी पाकिस्तानचा संघ ठरला; विजयासाठी शेजाऱ्यांनी मोठा प्लॅन आखला
15
सुंदर दिसणाऱ्या काव्या मारनचा आवाज ऐकलात का? केन विलियम्सनसोबतचा Video Viral 
16
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला
17
‘नेहमीप्रमाणे राजकीय हिटमॅनने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला’, त्या व्हिडीओवरून स्वाती मालिवाल यांचं प्रत्युत्तर
18
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
19
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी
20
रोहित, हार्दिक यांना Mumbai Indians संघात ठेवणार नाही, तर... ; वीरेंद्र सेहवागचा दावा

नवी मुंबईत आरोग्य रामभरोसे, व्हेंटिलेटर्ससह आयसीयूची कमतरता

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2020 12:43 AM

नवी मुंबई महानगरपालिकेने वाशीमधील सिडको प्रदर्शन केंद्रामध्ये १,२०० बेडचे रुग्णालय सुरू केले आहे. राधास्वामी सत्संग भवनमध्ये ४०८ बेड व एपीएमसीच्या निर्यात भवनमध्ये ५०३ बेड उपलब्ध केले आहेत.

- नामदेव मोरेनवी मुंबई : शहरात सर्वसामान्य लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी बेडची मुबलक उपलब्धता आहे, परंतु प्रकृती गंभीर झालेल्या रुग्णांसाठी आयसीयू युनिट व व्हेंटिलेटर्स उपलब्ध होत नाहीत. सर्व प्रमुख रुग्णालयांमध्ये जागा उपलब्ध होत नसून, गरीब व श्रीमंत सर्वांचेच आरोग्य रामभरोसे सुरू आहे. गंभीर प्रकृती झालेल्यांनी जायचे कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.नवी मुंबई महानगरपालिकेने वाशीमधील सिडको प्रदर्शन केंद्रामध्ये १,२०० बेडचे रुग्णालय सुरू केले आहे. राधास्वामी सत्संग भवनमध्ये ४०८ बेड व एपीएमसीच्या निर्यात भवनमध्ये ५०३ बेड उपलब्ध केले आहेत. मनपा व खासगी रुग्णालयामध्ये तब्बल ५,८७४ बेडची उपलब्धता असून, त्यापैकी ३,२२२ बेडचा वापर सुरू आहे. तब्बल २,६५२ बेड शिल्लक असल्याचा दावा महानगरपालिका प्रशासन करत आहे, परंतु प्रत्यक्षात वस्तुस्थिती वेगळी आहे.कोरोनाची प्राथमिक लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी आवश्यकतेपेक्षा जास्त बेडची निर्मिती केली आहे, परंतु ज्यांची प्रकृती गंभीर झाली आहे व ज्यांना आयसीयू व व्हेंटिलेटर्सची आवश्यकता आहे, अशा रुग्णांसाठी बेडची कमतरता निर्माण होत आहे.मनपाने धूळफेक थांबवावीनवी मुंबई पालिकेने शहरात ५,८७४ बेडची व्यवस्था केलेली असून, सद्यस्थितीमध्ये २,६५२ बेड शिल्लक असल्याची माहिती संकेतस्थळावर दिली आहे, परंतु प्रत्यक्षात सर्वसामान्य लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी पुरेसे बेड आहेत. ज्या रुग्णांना दहा लीटरपेक्षा जास्त आॅक्सिजन लागतो, अशा रुग्णांना आयसीयू व व्हेंटिलेटर्स असलेल्या रुग्णालयात घेऊन जा, असे सांगितले आहे. मनपाच्या व प्रमुख खासगी रुग्णालयातही हे बेड उपलब्ध होत नाहीत. यामुळे सर्वसामान्यांनी जायचे कुठे, असा प्रश्न उपस्थित होते. मनपाने धूळफेक थांबवून व्हेंटिलेटर्स, आयसीयू युनिट वाढविण्याची मागणी होत आहे.बेडच शिल्लक नसल्याने गैरसोयमनपाच्या वाशीतील डेडिकेटेड कोविड रुग्णालयात सर्व बेड हाऊसफुल झाले आहेत. नवी मुंबईमधील सर्व प्रमुख खासगी रुग्णालयांमध्येही आयसीयू व व्हेंटिलेटर्स युनिट शिल्लक नाहीत. सर्व रुग्णालयांमध्ये फक्त ३३६ आयसीयू युनिट असून, त्यामधील फक्त १० शिल्लक असून, प्रमुख रुग्णालयांमध्ये एकही बेड उपलब्ध नाही. शहरात सद्यस्थितीमध्ये १२१ व्हेंटिलेटर्स आहेत. त्यापैकी फक्त ३ व्हेंटिलेटर्स शिल्लक आहेत.रुग्णालयनिहाय बेड व शिल्लक व्हेंटिलेटर्स, आयसीयूचा आजचा तपशीलरूग्णालय एकूण बेड वापर शिल्लक बेड आयसीयू व्हेंटिलेटर्समनपा वाशी रूग्णालय १७५ १७५ ० ० ०तेरणा, नेरूळ १०० ९८ २ ० ०फोर्टीस, वाशी ८५ ८५ ० ० ०रिलायन्स, कोपरखैरणे १०० १०० ० ० ०एमजीएम, सीबीडी ४० ३१ ९ ५ ०एमपीसीटी, सानपाडा ८३ ८३ ० ० ०अपोलो, सीबीडी १३६ १३६ ० ० ०पीकेसी रूग्णालय ४७ ३८ ९ ० ०न्यूरोजन नेरूळ ७५ ७४ १ ० ०इंद्रावती ऐरोली ४० ४० ० ० ०सनशाइन नेरूळ ४० २८ १२ ० ०डी. वाय. पाटील ३०० २४१ ५९ ० ०सिडको प्रदर्शन केंद्र ५१३ १४५ ३६८ ० ०हेरिटेज ऐरोली १० १० ० ० ०न्यू मिलेनियम २० २१ ० ० २न्यू मानक ४३ १७ २६ ५ ०लक्ष्मी, घणसोली १५ १५ ० ० ०फ्रिझन, घणसोली १९ १९ ० ० ०व्हिनस रूग्णालय १२ ४ ८ ० ०निर्मल मल्टीस्पेशालीटी १३ ९ ४ ० ०राजपाल, कोपरखैरणे २० २० ० ० ०सिद्धिका, कोपखैरणे ५ ५ ० ० २एमजीएम, वाशी २० २१ ० ० ०एमजीएम, सानपाडा ७५ ६३ १२ ० ०एपीएमसी निर्यातभवन ५०३ १४९ ३५४ ० ०राधास्वामी सत्संग भवन ४०८ १६८ २४० ० ०

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस