उन्हाळी सुट्ट्यांसाठी कोकण रेल्वे मुंबई-मडगाव विशेष ट्रेन चालविणार; कधी सुटणार? सविस्तर पाहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 07:19 IST2026-03-25T07:17:48+5:302026-03-25T07:19:25+5:30

या विशेष गाड्यांमुळे कोकण व गोवा गाठणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

konkan railway to run mumbai goa madgaon special train for summer holidays see details | उन्हाळी सुट्ट्यांसाठी कोकण रेल्वे मुंबई-मडगाव विशेष ट्रेन चालविणार; कधी सुटणार? सविस्तर पाहा

उन्हाळी सुट्ट्यांसाठी कोकण रेल्वे मुंबई-मडगाव विशेष ट्रेन चालविणार; कधी सुटणार? सविस्तर पाहा

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : एप्रिलच्या सुरुवातीला सुट्ट्यांचा कालावधी आणि पर्यटन हंगाम लक्षात घेता मुंबई ते मडगावदरम्यान विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय कोकणरेल्वेने घेतला आहे. या विशेष गाड्यांमुळे कोकण व गोवा गाठणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

गाडी क्रमांक ०११२९ मुंबई सीएसएमटी- मडगाव जंक्शन विशेष ही गाडी ३ एप्रिल व ५ एप्रिल रोजी रात्री १२:२० वाजता सीएसएमटी येथून सुटेल. मार्गात विविध स्थानकांवर थांबे घेत ही गाडी त्याच दिवशी दुपारी ३:१५ वाजता मडगाव जंक्शन येथे पोहोचेल. 

परतीच्या प्रवासासाठी गाडी क्रमांक ०११३० मडगाव जंक्शन सीएसएमटी विशेष ही गाडी ३ व ५ एप्रिलला सायंकाळी ४:०० वाजता मडगाव येथून सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी पहाटे ३:४५ वाजता मुंबई सीएसएमटी येथे दाखल होईल.
 

Web Title : गर्मी की छुट्टियों के लिए कोंकण रेलवे चलाएगा मुंबई-मडगांव विशेष ट्रेन

Web Summary : कोंकण रेलवे 3 और 5 अप्रैल से मुंबई-मडगांव विशेष ट्रेनें चलाएगा. ये ट्रेनें सीएसएमटी से रात 12:20 बजे रवाना होकर दोपहर 3:15 बजे मडगांव पहुंचेंगी. वापसी में भी ट्रेनें उसी तारीख को उपलब्ध रहेंगी.

Web Title : Konkan Railway to Run Mumbai-Madgaon Special for Summer Vacation

Web Summary : Konkan Railway will run special Mumbai-Madgaon trains starting April 3rd and 5th, departing CSMT at 12:20 AM and reaching Madgaon at 3:15 PM. Return trains also run on those dates.