शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

जेएनपीएचे आता एक कोटी कंटेनर हाताळणीचे लक्ष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2022 11:20 IST

मेगा बंदराच्या निर्मितीनंतर मालवाहतूक हाताळणी क्षमतेमध्ये दरवर्षी सुमारे ४६६ दशलक्ष टनांची वाढ होणे अपेक्षित आहे.

मधुकर ठाकूर

उरण : जेएनपीए बंदराने २६ मे २०२२ रोजी  ३३ व्या वर्षात पदार्पण केले आहे. मागील ३३ वर्षात जेएनपीएने कामगिरीत व जहाजांच्या ड्वेल टाइममध्येही सुधारणा केली आहे. विविध विस्तार योजनांमुळे २०२५ मध्ये जेएनपीए लवकरच एक कोटी कंटेनर मालाची हाताळणी करणारे देशातील एकमेव बंदर ठरणार आहे. तसेच येत्या काही महिन्यात आणखी काही मोठे प्रकल्प व महत्त्वाचे उपक्रम कार्यान्वित होतील. या सर्व उपक्रमांमुळे जेएनपीएला पुढील दशकात परिवर्तनाच्या पुढच्या टप्प्यात पोहोचण्यास मदत होणार आहे. मागील जेएनपीएने सेंट्रलाइज्ड पार्किंग प्लाझा आणि जेएनपीए-सेझसारखे काही प्रकल्प कार्यान्वित केले. बंदरे, नौकानयन व जलमार्ग मंत्रालयाच्या  सूचनांनुसार ‘ईझ ऑफ डुइंग बिझिनेस’साठी इतर अनेक महत्वाच्या उपाययोजना केल्या. मेगा बंदराच्या निर्मितीनंतर मालवाहतूक हाताळणी क्षमतेमध्ये दरवर्षी सुमारे ४६६ दशलक्ष टनांची वाढ होणे अपेक्षित आहे.

सर्वात मोठा पायाभूत प्रकल्पअशा बंदरांमुळे किनारपट्टीवरील मालवाहतुकीलाही चालना मिळेल. रेल्वे तसेच रस्ते मार्गावरील वाहतुकीचा ताण कमी होईल आणि आंतर्देशीय वाहतुकीचा खर्चसुद्धा ८० टक्क्यांपर्यंत कमी होईल, असा विश्वास जेएनपीएकडून ३३ व्या वर्षांत पदार्पणात व्यक्त केला.

मागील ३३ वर्षात जेएनपीएने कार्यक्षमतेच्या निकषांमध्ये सुधारणा करण्यासाठी सातत्याने स्वत:ला विकसित केले आहे. बंदराच्या कामगिरीमध्ये व जहाजांच्या ड्वेल टाइममध्येही सुधारणा केली आहे.  विविध सफल विस्तार योजनांमुळे आणि चौथ्या टर्मिनल दुसऱ्या टप्प्यातील काम पूर्णत्वास गेल्यावर २०२५ मध्ये जेएनपीए एक कोटी कंटेनर मालाची हाताळणी करणारे देशातील एकमेव बंदर ठरणार आहे.- संजय सेठी, अध्यक्ष  जवाहरलाल नेहरू पोर्ट ॲथोरिटी.

राजीव गांधी यांच्या हस्ते लोकार्पणजवाहरलाल नेहरू बंदराची निर्मिती २६ मे १९८९ रोजी झाली. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हस्ते या बंदराचे लोकार्पण झाले होते. त्यानंतर आधुनिकीकरण आणि कामगिरीच्या जोरावर  देशातील पहिल्या क्रमांकाचे युवा पोर्ट म्हणून गणले गेले. तसेच जागतिक स्तरावरही २६ व्या क्रमांकावर पोहोचून जेएनपीएने वेगळीच ओळख निर्माण केली.

१५.८० मीटर खोलीपर्यंत सुमारे १५ हजार कंटेनर मालाची भविष्यात वाहतूक करणारी मोठ्या आकाराच्या जहाजांची हाताळणी करण्यासाठी समुद्रकिनारी अधिक खोलीची उपलब्धता, सुगम व गतिमान माल वाहतुकीसाठी प्रभावी आंतर्देशीय कनेक्टिव्हिटी आणि शाश्वत औद्योगिक परिसंस्था निर्माण करण्यासाठी पर्याप्त जमिनीची उपलब्धता आदी बाबींना प्राधान्य देण्यात आले आहे. 

टॅग्स :JNPTजेएनपीटीNavi Mumbaiनवी मुंबई