नवी मुबई : लोकमत माध्यम प्रायोजक आणि सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ, शिरवणे यांच्या संयुक्त विद्यमाने दुर्गोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मंडळाचे यंदाचे हे ३० वे वर्ष असून नवरात्रौत्सव काळात देवीची उपासना, धार्मिक तसेच मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या स्पर्धा तसेच महिलांसाठीही विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. नवरात्रौत्सवाच्या माध्यमातून संस्कृतीचा वारसा, परंपरा तसेच धार्मिकता जपण्याचे प्रयत्न केले जात असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष जयवंत सुतार यांनी दिली. आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकांना मंडळाच्या माध्यमातून मदत करतात. अध्यक्ष विनायक भोईर, उपाध्यक्ष धनंजय थोरात, सचिव संदीप पाटील, खजिनदार रोशन प्रभाकर किरवडकर, प्रमुख सल्लागार माधुरी सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली हा नवरात्रौत्सव साजरा केला जात आहे. (प्रतिनिधी)
शिरवणेतील दुर्गोत्सव उत्साहात
By admin | Updated: October 11, 2016 03:34 IST