शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

अपघातातील इनोव्हा सापडली

By admin | Updated: January 4, 2015 01:13 IST

आरोपी चालकाला गोरेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक निवास वामन राणे यांनी सांताक्रुझ येथून शनिवारी गजाआड केले आहे.

मुंबई : गोरेगाव येथे एक महिन्यापूर्वी एका वृद्ध महिलेचा अपघात झाला होता. कोणत्या वाहनाने या वृद्धेला उडविले असेल याचा अंदाज वर्तवू शकेल असा एकही पुरावा नसताना केवळ गाडीच्या शेवटच्या चार अंकी डिझीट क्रमांकांवरून फरार असलेल्या आरोपी चालकाला गोरेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक निवास वामन राणे यांनी सांताक्रुझ येथून शनिवारी गजाआड केले आहे.८ डिसेंबर रोजी पहाटे ६च्या सुमारास दूध आणायला गेलेल्या राजमती जैन या महिलेला एका इनोव्हा कारने धडक दिली होती. या अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या. ८ वाजले तरी आई घरी परत आली नाही म्हणून त्यांची मुलगी गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करायला गेली. तेव्हा तिथे त्यांना एका महिलेचा अपघात झाल्याची माहिती मिळाली. ती महिला दुसरीतिसरी कोणी नसून त्यांची आईच असल्याचे समजले. अपघातानंतर गोरेगाव पोलिसांनी तत्काळ जैन यांना नायर रुग्णालयात दाखल केले होते. घटनास्थळी एका रिक्षावाल्याने गाडीचा शेवटचा ८८१५ या क्रमांक टिपून सिटी सेंटर मॉलच्या वॉचमनला दिला आणि वॉचमनने पोलिसांना दिला. जैन यांच्या नातेवाइकांनी पोलिसांना एका दुकानातील अपघाताच्या वेळचे सीसीटीव्ही चित्रण दिले होते. मात्र तेसुद्धा अस्पष्ट होते. या अपघातानंतर जैन यांची प्रकृती अस्थिर असून, त्यांच्यावर बॉम्बे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर गाडीच्या डाव्या बाजूचे नुकसान झाले होते. मात्र रमिकलालने अपघातानंतर लगेचचे गाडीची रंगरंगोटी करून घेतली. त्यावरून गाडीच्या मालकासह चालकाची तपासणी केली असता चालकाने या गुन्ह्याची कबुली दिली. लोक मारतील या भीतीने आपण घटनास्थळावरून पळून गेल्याची कबुली चालकाने दिली. या प्रकरणी जोगेश्वरी येथे राहणारा चालक तेजबहादूर रामचंद्र गिरी (३७) याला सांताक्रुझ येथून अटक केली.अपघातग्रस्त इनोव्हा गाडीच्या मालकाचा लहान भाऊ हा गोरेगाव राममंदिर परिसरात राहतो. त्याला वसई येथे ८ डिसेंबरला पहाटे जैन मंदिरात दर्शनासाठी जायचे होते. म्हणून मालकाने चालकासह गाडी गोरेगाव येथे पाठवली होती. मात्र त्या दिवशी भावाची तब्येत बिघडल्याने त्याने गाडी परत पाठवली. चालक गिरी हा गाडी घेऊन सांताक्रुझच्या दिशेला वेगाने जात असताना गोरेगाव एस.व्ही. रोड सिटी सेंटर येथे त्याने राजमती यांना उडविले. उद्या आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती तपासअधिकारी राणे यांनी दिली.या अपघाताचे तपासअधिकरी राणे यांनी आरटीओमधून जवळपास ८८१५ सिरीजच्या १५ इनोव्हा गाड्यांसह मालकांची तपासणी केली. त्यांच्या तपासाला अखेर यश आले. शेवटची पंधरावी इनोव्हा गाडी क्रमांक एम.एच. ०४ सी.जे. ८८१५ ही अपघातग्रस्त गाडी निघाली. ती सांताक्रुझ येथील रमिकलाल या स्पेअर पार्टच्या व्यावसायिकाची निघाली.