शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

सहा महिन्यांत घरभाडे २५ टक्क्यांनी महागले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 06:52 IST

बांधकाम क्षेत्रातील मंदीमुळे घर विक्रीला घरघर लागली आहे. त्यामुळे भाडेतत्त्वावरील घरांना मागणी वाढली आहे. परंतु घरभाड्यात होणाऱ्या अनियंत्रित वाढीमुळे सर्वसामान्य मध्यमवर्गीयांची परवड सुरू आहे

कमलाकर कांबळे नवी मुंबई : बांधकाम क्षेत्रातील मंदीमुळे घर विक्रीला घरघर लागली आहे. त्यामुळे भाडेतत्त्वावरील घरांना मागणी वाढली आहे. परंतु घरभाड्यात होणाऱ्या अनियंत्रित वाढीमुळे सर्वसामान्य मध्यमवर्गीयांची परवड सुरू आहे. गेल्या सहा महिन्यांत घरभाड्यात जवळपास २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे या अनियमित वाढीला आळा घालावा, अशी मागणी मध्यमवर्गीयांकडून केली जात आहे.मागील काही वर्षांपासून रियल इस्टेट क्षेत्राला मंदीचा सामना करावा लागत आहे. जमिनीच्या किमती गगनाला भिडल्याने बजेटमधील घरे कालबाह्य झाली आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या घर खरेदीच्या स्वप्नांना खीळ बसली आहे. यातच गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात करण्यात आलेली नोटाबंदी या व्यवसायाच्या मुळावर बेतली आहे. एकूणच बांधकाम व्यावसायिकांचे कंबरडे मोडले आहे. नोटाबंदीनंतर बांधकाम उद्योगात निर्माण झालेल्या अस्थिर परिस्थितीमुळे ग्राहकांनी घर खरेदीकडे पाठ फिरविली आहे. स्वघराच्या स्वप्नांना मुरड घालीत अनेकांनी भाडेतत्त्वावरील घरांना प्राधान्य दिले आहे. त्यामुळे मागील सहा-सात महिन्यांत भाडेतत्त्वावरील घरांना मागणी वाढल्याचे दिसून आले आहे. नेमका याचाच फायदा घेत घरमालक आणि दलालांनी घरभाड्यात अव्वाच्या सव्वा वाढ केली आहे. ही वाढ वीस ते पंचवीस टक्केच्या घरात आहे.सध्या सर्वाधिक घरभाडे वाशी विभागात आकारले जाते. येथे वन रूम किचनसाठी लोकेशननुसार सात ते चौदा हजार रुपये आकारले जातात. वन बीचएकेसाठी सोळा ते वीस हजार रुपये भाडे आकारले जाते. तर टू बीएचकेसाठी हा दर बावीस ते तीस हजार रुपये इतका आहे. मागील वर्षभरात या घरांच्या भाडेदरात सरासरी तीन ते चार हजार रुपयांची वाढ झाली आहे. विशेषत: गेल्या सहा-सात महिन्यांत यात मोठ्याप्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले आहे.घरमालक आणि भाडेकरू यांच्यात अकरा महिन्यांचा करार असतो. प्रत्येक अकरा महिन्यांनंतर साधारण आठ ते दहा टक्के भाडेवाढ करण्याचा अलिखित करार असतो. असे असतानाही या नियमाला फाटा देत घरभाड्यांत मनमानी पध्दतीने वाढ केली जात असल्याचे आढळून आले आहे. वाशीपाठोपाठ नेरूळ, सीबीडी, खारघर, कोपरखैरणे, घणसोली व ऐरोली या भागातील घरभाडेही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे.नवीन पनवेल, खांदा वसाहत, कळंबोली व कामोठे या भागांत अन्य उपनगरांच्या तुलनेत घरभाडे कमी आहे. तर गाव व गावठाण भागात उभारण्यात आलेल्या अनधिकृत चाळी व इमारतींतून शहरी भागाच्या तुलनेत कमी घरभाडे आकारले जाते.पगडी पद्धतीचा परिणामअलीकडच्या काळात मासिक घरभाडे देण्याऐवजी पगडी अर्थात हेवी डिपॉझिट ही संकल्पना अधिक रुजली आहे. यात गुंतवणूकदार घरमालकाला हेवी अर्थात अधिक डिपॉझिट देतात. घरमालकाबरोबर दोन ते तीन वर्षांचा करार केला जातो. कराराचा कालावधी संपल्यानंतर घरमालक हे डिपॉझिट गुंतवणूकदाराला परत करतो.या कालावधीत सदर गुंतवणूकदार हे घर वाढीव भाडे दराने इतरांना देतो. यातून मिळणाºया घरभाड्यावर संपूर्ण अधिकार गुंतवणूकदाराचा असतो. त्यामुळे अधिकाधिक भाडे मिळावे, असाच या गुंतवणूकदाराचा प्रयत्न असतो. त्यामुळे घराचे भाडे अनियंत्रितपणे वाढत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.