शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेतील गुणवंत विद्यार्थ्यांना मदतीचा हात

By admin | Updated: June 29, 2017 03:03 IST

महापालिकेच्या शाळेत शिक्षण घेऊन दहावीमध्ये चांगले गुण मिळविणाऱ्या व शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना शिवसेनेने मदतीचा

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : महापालिकेच्या शाळेत शिक्षण घेऊन दहावीमध्ये चांगले गुण मिळविणाऱ्या व शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना शिवसेनेने मदतीचा हात पुढे केला आहे. १४ विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी प्रत्येकी २० हजार रुपयांची मदत दिली असून, यामध्ये पालिकेच्या घंटागाडीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या मुलाचाही समावेश आहे. नवी मुंबई महापालिका शाळेतील विद्यार्थी विविध क्षेत्रामध्ये नावलौकिक मिळवू लागले आहेत. ५वी व ८वीच्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये अनुप संजय देसाई, रितेश बिरूदेव वाघमोडे, सानिका कैलास गुंडाकर यांनी यश मिळविले आहे. दहावी परीक्षेमध्ये हरिकृष्ण तुकाराम बैनाळे, दरिया पकाराम चौधरी व आरती हरिशंकर गुप्ता यांनी ९० टक्केपेक्षा जास्त गुण मिळविले आहेत. ईटीसी अपंग शिक्षण व प्रशिक्षण केंद्रातील पूजा बाळासाहेब निकम, प्रीतम अदिक गोसावी, विठ्ठल विजय रावळे, स्नेहल संतोष साळुंखे, साक्षी संजय पवार, प्रवीण भास्कर मोरे यांनीही यश मिळविले आहे.पाचवीमध्ये शिक्षण घेणाऱ्या शहरातील पालिका व खासगी मिळून ४२४ शाळांमधील ३४६५ विद्यार्थ्यांनी व ८वीमधील २८३० विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीची परीक्षा दिली होती. मनपा व खासगी शाळेतील एकूण ६२ विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे. महापालिका शाळेतील १४ गुणवंत विद्यार्थ्यांचा बुधवारी शिवसेना नगरसेवक किशोर पाठकर यांनी विशेष सत्कार केला. या सर्व विद्यार्थ्यांना प्रत्येकी २० हजार रुपये मदत केली आहे. महापालिकेच्या घनकचरा विभागातील घंटागाडीवर काम करणाऱ्या तुकाराम बैनाळे यांचा मुलगा दहावीमध्ये पालिका शाळेत पहिला आला आहे. त्याचाही विशेष सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास परिवहन सदस्य विसाजी लोके व इतर मान्यवरही उपस्थित होते.