शहरं
Join us  
Trending Stories
1
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
2
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
3
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
4
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
5
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
6
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
7
Latest Marathi News LIVE Updates: भाजपाने मतदारसंघ पुनर्रचना केलेल्या अधिकाऱ्यांनाच नोकरीवर घेतले, रोहित पवारांचा आरोप
8
सोलापूर-पुण्याहूनही सुटणार पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन? जाणून घ्या, कुठे जाणार अन् थांबणार!
9
चीनने इराणला पाठवले मिसाईल्ससाठीचे केमिकल्स, अमेरिकेने पकडलेल्या जहाजात सापडला साठा; निक्की हेलींचा दावा
10
माजी क्रिकेटपटू, तृणमूल खासदार युसूफ पठाणचे सासरे आणि मेहुण्याला अटक, मुंबई पोलिसांनी केली कारवाई
11
अरे बापरे! मोमोज खाणं ठरलं जीवघेणं; १० वर्षांच्या मुलीचं लिव्हर फेल, आठवेना, चालताही येईना
12
ट्रम्प आता पाकिस्तानचेही ऐकेनात, इराणला दिली उघड धमकी; म्हणाले, “करार होत नाही तोपर्यंत...”
13
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या कोट्यवधीच्या प्रॉपर्टीवर येणार तात्पुरती टाच; 'अशी' होणार कुटुंबियांची अडचण
14
MHADA Lottery: गिरणी कामगारांच्या २,५२१ घरांच्या लॉटरीला विलंब लागण्याची चिन्हे 
15
जिनिलियाचं रितेशवरील प्रेम पाहून भारावली भाग्यश्री, 'राजा शिवाजी' सेटवरचा किस्सा सांगत म्हणाली...
16
Video - संतापजनक! "तू क्यूट दिसतेस, एकटीच राहतेस का?"; रॅपिडो ड्रायव्हरचा तरुणीला मेसेज
17
Apple च्या CEO पदी नियुक्ती; कोण आहेत जॉन टर्नस? टिम कुक यांची जागा घेणार...
18
IPL 2026: सूर्यकुमार यादवचा 'फ्लॉप शो' सुरूच, ६ पैकी ५ सामन्यात 'फेल'; MI संघाबाहेर काढणार?
19
Mamata Banerjee : "माझं विमान रनवेवर मुद्दाम ३० मिनिटं थांबवलं, याचा बदला घेऊ"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
20
Vastu Tips: वारंवार येणारे अडथळे आणि आर्थिक चणचण? वास्तुशास्त्राचे 'हे' सोपे उपाय ठरतील रामबाण!
Daily Top 2Weekly Top 5

दिघ्यात बांधकामांवर हातोडा

By admin | Updated: September 30, 2015 00:19 IST

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एमआयडीसीने दिघ्यातील बेकायदा बांधकामांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. कारवाईच्या पाहिल्या टप्प्यात बांधकाम सुरू असलेल्या

नवी मुंबई: उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एमआयडीसीने दिघ्यातील बेकायदा बांधकामांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. कारवाईच्या पाहिल्या टप्प्यात बांधकाम सुरू असलेल्या दोन इमारती मंगळवारी जमीनदोस्त करण्यात आल्या. उद्यापासून ही कारवाई मोहीम अधिक तीव्र करण्याचा निर्णय एमआयडीसीने घेतला आहे. त्यामुळे या परिसरातील भूमाफियांचे धाबे दणाणले आहेत. दिघा परिसरातील ९९ इमारतींवर कारवाई करून सात दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार एमआयडीसीने मंगळवारपासून कारवाईचा धडाका सुरू केला आहे. कारवाईच्या पहिल्या दिवशी दिघा गावातील दोन इमारतींवर बुलडोझर फिरविण्यात आला. या दोन्ही इमारतींचे काम सुरू होते. पहिल्या टप्प्यात बांधकाम सुरू असलेल्या इमारतींवर कारवाई करण्यात येणार आहे. त्यानंतर न्यायालयाने निर्देशित केलेल्या इमारतींवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. आरटीआय कार्यकर्ते राजीव मिश्रा यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेची दखल घेत दिघा परिसरातील ९९ इमारतींवर कारवाई करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार एमआयडीसीने मंगळवारपासून कारवाई सुरू केली. विशेष म्हणजे महापालिका व सिडको यांची मदत न घेता एमआयडीसीने स्वबळावर कारवाई केली. दरम्यान, या कारवाईच्या पार्श्वभूमीवर स्थानिकांचा विरोध लक्षात घेवून कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.