शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
2
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
3
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
4
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
5
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
6
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
7
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
8
NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक
9
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
10
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
11
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
12
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
13
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
14
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
15
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
16
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
17
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
18
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
19
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
20
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत

पालकमंत्र्यांनी घेतला कोविडसंदर्भातील आढावा, जम्बो सेंटरमध्ये १०० बेड मुलांसाठी ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 10:10 AM

शासनाच्या माध्यमातून जेवढे डोस आपल्याला उपलब्ध होतील, त्याचा वापर लवकरात लवकर करण्याच्या सूचना तटकरे यांनी दिल्या. दुसरा डोस घेणाऱ्या नागरिकांवर लक्ष केंद्रित करायला सांगण्यात आले.

नवीन पनवेल : रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी पनवेल येथील फडके नाट्यगृह येथे कोरोनासंदर्भातील आढावा घेतला. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, पालिका आयुक्त सुधाकर देशमुख, आमदार बाळाराम पाटील, प्रांत अधिकारी दत्तात्रय नवले, ललिता बाबर, तहसीलदार विजय तळेकर आदी उपस्थित होते.शासनाच्या माध्यमातून जेवढे डोस आपल्याला उपलब्ध होतील, त्याचा वापर लवकरात लवकर करण्याच्या सूचना तटकरे यांनी दिल्या. दुसरा डोस घेणाऱ्या नागरिकांवर लक्ष केंद्रित करायला सांगण्यात आले. सिडकोच्या माध्यमातून जम्बो सेंटर चालू आहे. त्यामध्ये किमान शंभर बेड तरी लहान मुलांसाठी ठेवायला हवेत, अशा सूचना देण्यात आल्याची माहिती पालकमंत्र्यांनी दिली. महापालिकेला पेडियाट्रिक डॉक्टरसोबत संपर्क ठेवण्यास सांगण्यात आले असून, जेणेकरून आपण तिसऱ्या लाटेचा सामना करू शकू. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पुढच्या तयारीच्या दृष्टीने तयारी सुरू असल्याचे सांगण्यात आले. तसेच कंटेनमेंट झोनमध्ये सर्व गोष्टींचे पालन करण्याच्या सूचना दिल्या. पनवेल परिसरात कोरोनाचे प्रमाण कमी होत चालले आहे. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन अदिती तटकरे यानी केले. जे नागरिक दुसऱ्या डोससाठी तयार आहेत, त्यांना संपर्क करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, सुधाकर देशमुख, आमदार बाळाराम पाटील यांनी कोरोनासंदर्भातील माहिती या आढावा बैठकीत दिली. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCorona vaccineकोरोनाची लसhospitalहॉस्पिटलdocterडॉक्टरOxygen Cylinderऑक्सिजन