शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

उद्यानात मद्यपान करणाऱ्यांची धरपकड

By admin | Updated: December 23, 2016 03:28 IST

सार्वजनिक ठिकाणी उद्यानांमध्ये मद्यपान व अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या १८ जणांवर कोपरखैरणे पोलिसांनी कारवाई केली

नवी मुंबई : सार्वजनिक ठिकाणी उद्यानांमध्ये मद्यपान व अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या १८ जणांवर कोपरखैरणे पोलिसांनी कारवाई केली आहे. विशेष पथक तयार करून पोलिसांनी परिसरातील उद्यानांची व मैदानांची झाडाझडती घेतली. त्यामध्ये उद्यानात चालणारे गैरप्रकार उघडकीस आले आहेत.उद्यानात व खेळाच्या मैदानात गर्दुल्ल्यांचा वावर होत असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे प्राप्त होत होत्या. या गर्दुल्ल्यांमुळे सर्वसामान्यांना उद्यानात जायचे टाळावे लागत होते. रात्रीच्या वेळी हे गर्दुल्ले नशेमध्ये एखाद्या महिला किंवा मुलीची छेड काढण्याचेही प्रकार घडण्याची शक्यता असायची. काही ठिकाणी छेडाछाडीचे असे प्रकार घडले देखील आहेत. कोपरखैरणे सेक्टर ५ ते ८, १ ते ४, १५ ते १८ व ४ ए याठिकाणची उद्याने रहिवासी क्षेत्रात आहेत. त्याठिकाणी परिसरातील लहानथोर सकाळ, संध्याकाळी विरंगुळ्याच्या उद्देशाने जमतात. परंतु अशा उद्यानांचा वापर गर्दुल्ल्यांकडून मद्यपान अथवा अमली पदार्थाचे सेवन करण्यासाठी केला जायचा. यामुळे त्याठिकाणी येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला होता. परिणामी काही महिला, पुरुषांना उद्यानात जायचे बंद करावे लागले आहे. तर खेळाच्या मैदानात बसणाऱ्या गर्दुल्ल्यांकडून टाकल्या जाणाऱ्या बाटल्यांचा खच साचल्याने मैदानांची दुरवस्था झालेली आहे. अशा गैरप्रकारांना आळा घालण्याच्या उद्देशाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड यांनी दोन पथके तयार केली आहेत. त्यामध्ये दोन पोलीस निरीक्षक, पाच सहाय्यक निरीक्षक व २५ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या पथकाच्या माध्यमातून मागील दोन दिवसांत परिसरातील उद्याने व खेळाच्या मैदानांची झाडाझडती घेण्यात आली. यावेळी १८ जणांवर सार्वजनिक ठिकाणी व्यसन केल्याप्रकरणी कारवाई केल्याचे वरिष्ठ निरीक्षक सतीश गायकवाड यांनी सांगितले. पकडलेल्या अनेकांकडे चरस, गांजा यासह व्हाईटनर असे नशेसाठी वापरले जाणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे. त्यापैकी काहींना न्यायालयाने वैयक्तिक १५ हजार रुपयांच्या जातमुचल्यावर सुटका केली आहे. ही कारवाई यापुढे देखील सुरू राहणार असून सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांमध्ये कायद्याचा वचक निर्माण केला जाणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले. (प्रतिनिधी)