शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

सांडपाणी पुनर्वापर प्रकल्पाला शासनाची परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 00:45 IST

महापालिका एमआयडीसीला देणार पाणी; राज्यातील पहिला प्रकल्प

- नामदेव मोरे नवी मुंबई : अमृत योजनेमधून कोपरखैरणे व ऐरोली येथील मलनि:सारण केंद्रातील सांडपाण्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प महापालिका उभारणार आहे. १५० कोटी रुपये खर्च करून उभारलेल्या प्रकल्पातून ४० एमएलडी पाणी एमआयडीसीला पुरविण्यात येणार आहे. त्यासाठी ८३ किलोमीटर लांबीची पाइपलाइन टाकली जाणार असून या प्रकल्पाला शासनाने सोमवारी मंजुरी दिली आहे.घनकचरा व्यवस्थापन व सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेने उभारलेल्या प्रकल्पांचे देशभर कौतुक होत आहे. या दोन्ही कामांसाठी राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार पालिकेला मिळाले आहेत. महापालिकेने तब्बल ४५४ एमएलडी क्षमतेचे सात अत्याधुनिक मलनि:सारण केंद्रे उभारली आहेत. प्रक्रिया केलेले पाणी विकण्यासाठी पालिकेने प्रयत्न केला, परंतु त्यासाठी पायाभूत सुविधा नसल्यामुळे ते शक्य झाले नव्हते. यामुळे शासनाच्या अमृत योजनेमधून नवीन प्रक्रिया केंद्र उभारून प्रक्रिया केलेले पाणी एमआयडीसीला विकण्याचा नवीन प्रकल्प आयुक्त रामास्वामी एन. यांनी तयार केला होता.कोपरखैरणे व ऐरोली मलप्रक्रिया केंद्रात प्रत्येकी २० दशलक्ष लीटर क्षमतेचे टर्शिअरी ट्रीटमेंट प्रकल्प बांधणे, सर्वसमावेशक देखभाल करणे व चालविण्याचा सर्वंकष प्रस्ताव तयार केला होता. पुनर्प्रक्रियायुक्त पाण्याची मानके प्राप्त करण्याच्या दृष्टीने सर्वोत्तम तंत्रज्ञानासह युनिट उभारणे आवश्यक आहे. प्रक्रिया केलेले पाणी पुरविण्यासाठी आरसीसी सम्प तयार करावे लागणार आहेत. जलउदंचन केंद्र, जलकुंभ उभारणी करते, वितरण वाहिन्या टाकणे,विविध व्यासाच्या नळजोडण्या करणे अभिप्रेत आहे. सर्वसाधारण सभेने प्रशासकीय मंजुरी दिल्यानंतर त्याला शासनाची मंजुरी घेवून निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती.दोन महिन्यांपूर्वी टेक्टॉन इंजिनिअर्स अँड कन्स्ट्रक्शन कंपनीला प्रकल्प उभारण्याचे काम देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीने मंजूर केला होता. यानंतर तांत्रिक मंजुरीसाठी तो पुन्हा शासनाकडे पाठविला होता. शासनाने सोमवारी या प्रस्तावास मंजुरी दिली असून प्रत्यक्ष प्रकल्प उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.मलनि:सारण केंद्रातील पाण्यावर प्रक्रिया करणे व ४० एमएलडी पाणी एमआयडीसीतील कारखान्यांना पुरविण्यासाठीचा प्रकल्प उभारण्यासाठी १५० कोटी रुपये खर्च होणार आहेत. ऐरोली व घणसोलीमधील केंद्रातून कारखान्यांपर्यंत पाणीपुरवठा करण्यासाठी ८३ किलोमीटर लांबीची जलवाहिनी टाकली जाणार आहे. प्रकल्प उभारण्यापासून १६ वर्षे चालविण्याचा व देखभाल करण्यासाठी एकूण ३८० कोटी ६४ लाख रुपये खर्च होणार आहेत. महापालिका एमआयडीसीला पाणी विक्री करणार असून प्रत्येक तीन वर्षांनी पाणी दरामध्ये दहा टक्के वाढ केली जाणार आहे. १६ वर्षांमध्ये महापालिकेला यामधून ४९४ कोटी रुपये महसूल प्राप्त होणार आहे. शासनाने मंजुरी दिल्यामुळे प्रत्यक्षात हा प्रकल्प उभारण्याचे काम सुरू केले जाणार आहे.राज्यातील पहिला प्रयोगअमृत योजनेमधून नवी मुंबई महानगरपालिका सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी एमआयडीसीला पुरविणार आहे. राज्यातील हा पहिलाच प्रकल्प असणार आहे. अनेक महानगरपालिकांना त्यांच्याकडील सांडपाण्यावर प्रक्रियाही करता येत नाही. प्रक्रिया न करताच ते पाणी नदी व खाडीत सोडले जाते. परंतु नवी मुंबई महापालिका पाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करणार असून यामधून मोठ्या प्रमाणात महसूल प्राप्त होणार आहे.चार वर्षांतील सर्वात मोठा प्रकल्प२०१४ मध्ये महापालिकेच्या निवडणुका झाल्यापासून एकही महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू झालेला नव्हता. अर्थसंकल्पामध्ये घोषणा केल्या जात होत्या, परंतु प्रत्यक्षात योजना कार्यान्वित होत नव्हत्या. मात्र, आयुक्त रामास्वामी एन. यांनी शहर विकासाच्या कामांना गती दिली असून अमृत योजनेमधून सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याच्या प्रस्तावाला शासनाची मंजुरी मिळविली आहे.अमृत योजनेमधून सांडपाण्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प उभारण्यात येत आहे. दोन केंद्र उभारणे व ८३ किलोमीटर लांबीची जलवाहिनी टाकण्याचा या प्रकल्पाला शासनाने मंजुरी दिली असून लवकरच ते उभारण्याचे काम सुरू होईल.- डॉ. रामास्वामी एन.,आयुक्त महानगरपालिका

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई