शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

गॅस कंपनीच्या कारभाराचा बसतोय ग्राहकांना फटका

By admin | Updated: October 11, 2015 00:57 IST

घणसोली परिसरात पाइपद्वारे गॅसपुरवठा करणाऱ्या गॅस कंपनीच्या अनागोंदी कारभाराचा नागरिकांना फटका बसत आहे. बिल भरणा करायची अंतिम मुदत संपल्यानंतर

नवी मुंबई : घणसोली परिसरात पाइपद्वारे गॅसपुरवठा करणाऱ्या गॅस कंपनीच्या अनागोंदी कारभाराचा नागरिकांना फटका बसत आहे. बिल भरणा करायची अंतिम मुदत संपल्यानंतर ग्राहकांना बिले पाठवली जात आहेत. यामुळे बिलभरणा करताना ग्राहकांना १०० रुपये जादा मोजावे लागत आहेत.घणसोली परिसरात सध्या पाइपद्वारे ग्राहकांना गॅसपुरवठा होत आहे. त्यानुसार या गॅस ग्राहकांना दोन महिन्यांनी त्यांनी वापरलेल्या गॅसचे बिल पाठवण्यात येते. मात्र काही महिन्यांपासून महानगरच्या गॅस कंपनीच्या बिल वितरणात अनागोंदी कारभार सुरू आहे. बिलाची रक्कम भरणा करण्याची अंतिम मुदत संपल्यानंतर त्यांना बिलाची प्रत घरपोच होत आहे. मागील काही महिन्यांपासून घणसोली परिसरात हा प्रकार सुरू असल्याची गॅस ग्राहकांची तक्रार आहे. यामुळे उशिरा मिळालेल्या बिलाच्या रकमेचा भरणा करण्यासाठी संबंधित केंद्रावर गेलेल्या ग्राहकांचे तिथल्या कर्मचाऱ्यांसोबत वाद होत आहेत. कंपनीकडूनच बिल उशिरा मिळाल्याचे सांगूनही त्यांचे म्हणणे ऐकून घेतले जात नाही. यामुळे नागरिकांमध्ये गॅस कंपनीविरोधात असंतोष निर्माण झाला आहे. विजबिल वाटपात होणाऱ्या विलंबाचा फटका गॅस ग्राहकांना बसत असल्याची तक्रारदेखील घणसोली सिम्पलेक्स येथील ओम साई धाम सोसायटीने महानगर गॅस कंपनीला केली आहे. मात्र त्यानंतरही गॅस कंपनीकडून हा अनागोंदी कारभार सुरूच असल्याचा संताप सोसायटीचे पदाधिकारी भरत चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. याबाबत महानगर गॅस कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क झाला नाही. (प्रतिनिधी)