शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सवाकरिता सर्व परवानग्या आॅनलाइन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 02:30 IST

पनवेल महापालिका हद्दीतील गणेशोत्सव मंडळांना यंदा विविध परवानग्यांकरिता शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजविण्याची गरज पडणार नाही.

कळंबोली : पनवेल महापालिका हद्दीतील गणेशोत्सव मंडळांना यंदा विविध परवानग्यांकरिता शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजविण्याची गरज पडणार नाही. या सर्व परवानग्या आॅनलाइन मिळणार आहेत. त्याकरिता महापालिका प्रशासनाने पोर्टल तयार करण्याचे काम हाती घेतले आहे.पनवेल, नवीन पनवेल, कळंबोली, कामोठे, खारघर आणि तळोजा परिसरात खासगी गणपतींबरोबरच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची संख्या मोठी आहे. मंडळाच्या वतीने मंडप, पंडाल टाकण्याबरोबर डेकोरेशन, देखावे उभारले जातात. याकरिता स्थानिक स्वराज्य संस्था, महावितरण, स्थानिक पोलीस, वाहतूक विभागाची परवानगी घ्यावी लागते आणि त्यासाठी याकरिता संबंधित कार्यालयांमध्ये खेटे मारावे लागतात. अनेकदा मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची अडवणूकसुद्धा केली जाते. तसेच ना हरकत देण्यासाठी विलंब लावला जातो. या सर्व गोष्टींचा विचार करून महापालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी या सर्व परवानग्या एकाच वेळी एकाच ठिकाणी मिळाव्यात अशी सूचना सर्व शासकीय यंत्रणांना दिल्या आहेत. त्याचबरोबर मंडळाच्या पदाधिकाºयांना हेलपाटे मारायला लागू नये याकरिता परवानगी देण्याकरिता आॅनलाइन सुविधा करण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला आहे. याकरिता खास पोर्टल तयार करण्यात येणार आहे. शुक्रवारी महापालिकेत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक बोलाविण्यात आली होती. या वेळी पोलीस, सिडको, महसूल, महापालिका, वाहतूक विभागाचे अधिकारी उपस्थित होते.गणेशोत्सवाकरिता बांधण्यात येणारे स्टेज, मूर्तीची उंची किती असावी याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच या कालावधीत चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्याबाबतही डॉ. सुधाकर शिंदे यांनी पोलिसांना सूचना दिल्या. वाहतुकीची कोंडी होऊ नये, तसेच गणेशभक्तांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्याबाबतही वाहतूक पोलिसांना सांगण्यात आले. गणेशोत्सवाच्या काळात अखंडित वीजपुरवठा करण्याबरोबरच मिरवणुकीच्या मार्गावर विजेच्या तारा नाहीत ना याची पडताळणी करण्याची सूचना महावितरण कंपनीच्या प्रतिनिधींना आढावा बैठकीत करण्यात आली. याशिवाय विसर्जन घाटावर लाइटची व्यवस्था करण्याबरोबरच मिरवणुकीच्या मार्गावरील खड्डे बुजविण्याचे आदेश महापालिकेच्या अधिकाºयांना आयुक्तांनी दिले.नियमांचे पालन होईल याची दक्षता घ्यामहापालिका हद्दीत गणेशोत्सव साजरा होत असताना संबंधितांनी सर्व नियम पाळावेत, असा दंडक घालून देण्याबाबतही आयुक्तांनी उपस्थित अधिकाºयांना सूचना केल्या. त्यामध्ये वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही, तसेच आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घेण्याबाबत मंडळांना सूचना देण्यात याव्यात, असे डॉ. शिंदे यांनी बैठकीत सांगितले.