एकावर एक चार वाहन आदळली, सायन-पनवेल महामार्गावर अपघात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2021 05:24 PM2021-01-02T17:24:51+5:302021-01-02T17:25:48+5:30

या अपघात चार वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने अपघातात जीवितहानी झाली नसली तरी, एक महिला या अपघातात किरकोळ जखमी झाली आहे.

Four vehicles collided with each other on Sion-Panvel highway | एकावर एक चार वाहन आदळली, सायन-पनवेल महामार्गावर अपघात

एकावर एक चार वाहन आदळली, सायन-पनवेल महामार्गावर अपघात

googlenewsNext

पनवेल : सायन पनवेल महामार्गावर खारघरनजीक मुंबई लेनवर शनिवारी झालेल्या अपघातात एकावर एक अशी चार वाहने आदळल्याने महामार्गावर काही काळ वाहतूककोंडी झाली होती. एमएच.06,वी.1096 या वाहनाचा टायर फुटल्याने चालकाने ब्रेक दाबल्यावर मागून येणाऱ्या गाड्या एकमेकांवर आदळल्याने हा विचित्र अपघात झाला.
        
या अपघात चार वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने अपघातात जीवितहानी झाली नसली तरी, एक महिला या अपघातात किरकोळ जखमी झाली आहे. या अपघातामुळे जवळपास अर्धा तास महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी होती. खारघर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंद चव्हाण व वाहतूक कर्मचाऱ्यांनी अपघातग्रस्त वाहने बाजुला सारल्यानंतर त्याठिकाणची वाहतूक सुरळीत झाली.
 

Read in English

Web Title: Four vehicles collided with each other on Sion-Panvel highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.