शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

गुंजाळांचे चार मारेकरी शरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2015 03:51 IST

नगरसेवक रमेश गुंजाळ यांच्या हत्येप्रकरणात पोलिसांना हवे असलेले चारही मारेकरी पोलिसांपुढे रविवारी रात्री शरण आल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले

पंकज पाटील,अंबरनाथनगरसेवक रमेश गुंजाळ यांच्या हत्येप्रकरणात पोलिसांना हवे असलेले चारही मारेकरी पोलिसांपुढे रविवारी रात्री शरण आल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले. रविवारी रात्री उशिरापर्यंत पोलीस या चौघांची चौकशी करीत असल्याचे समजते. उद्या(सोमवारी) सकाळी त्यांना अटक करून न्यायालयात हजर केले जाणार असल्याचे पोलीस सूत्रांनी स्पष्ट केले. हे चारही आरोपी मोरीवली गावातील रहिवासी असून, गावातील वादातूनच ही हत्या झाल्याचे स्पष्ट झाले आहे.शिवसेना नगरसेवक गुंजाळ यांची मोरीवली उद्यानासमोर काही मारेकऱ्यांनी चॉपर व तलवारीने हत्या केली होती. या हत्येत वापरण्यात आलेली गाडी ही मोरीवली गावातील असल्याने, हत्येचे धागेदोरे हे मोरीवली गावाभोवतीच फिरत होते. मात्र, फिर्यादीने १३ आरोपींची नावे दिल्याने या १३ पैकी नक्की किती व्यक्तींचा या हत्येत सहभाग होता हे निश्चित करणे पोलिसांपुढील आव्हान होते. ११ व्यक्तींची नावे संशयित म्हणून घेतली गेली असली, तरी हत्येच्या ठिकाणी ४ ते ५ मारेकरीच होते, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले होते. विश्वसनीय माहितीनुसार, रविवारी रात्री पोलिसांपुढे शरण आलेल्यांत, सचिन चव्हाण, संदीप गायकर, विशाल जव्हेरी, दीपक काळींबे यांचा समावेश आहे. या कथित आरोपींनी शरण येताना, अंबरनाथ पोलीस स्टेशनऐवजी टिटवाळा पोलिसांकडे हजर होणे पसंत केले. इतर नऊ जणांची चौकशी सुरूच राहणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.