शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

हत्या प्रकरणातील चौघांना अटक

By admin | Updated: August 18, 2015 01:35 IST

साताऱ्यामधील पुसेगाव येथे झालेल्या मारामारीत दोघांची हत्या करून पळालेल्या चौघांना खारघर पोलिसांनी अटक केली आहे. गस्तीदरम्यान पोलिसांना त्यांच्यावर संशय आल्याने

नवी मुंबई : साताऱ्यामधील पुसेगाव येथे झालेल्या मारामारीत दोघांची हत्या करून पळालेल्या चौघांना खारघर पोलिसांनी अटक केली आहे. गस्तीदरम्यान पोलिसांना त्यांच्यावर संशय आल्याने चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. या हत्या प्रकरणात एकूण १२ गुन्हेगार असून यापूर्वी पुसेगाव पोलिसांनी दोघांना पकडले आहे.सातारा जिल्ह्यातील पुसेगाव येथे तीन दिवसांपूर्वी दोन गटांत हाणामारी झाली होती. दोनही टोळ्यातील तरुण एकाच खटाव तालुक्यातील बुध गावचे असून एकाच भावकीचे आहेत. एक वर्षापूर्वी झालेल्या भांडणात सात जणांच्या एका टोळीने दुसऱ्या टोळीतील एकाच्या कुटुंबातील व्यक्तींना मारहाण केलेली. याप्रकरणी त्यांना तुरुंगवास झाला होता. त्यानंतर दोन महिन्यांपूर्वी ते जामिनावर बाहेर आले होते. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्यांनी विरुध्द टोळीचा बदला घेण्यासाठी शनिवारी पुन्हा त्यांच्यावर हल्ला केला. यावेळी दोनही गटांत झालेल्या जबर हाणामारीमध्ये दोघांचा मृत्यू झाला. दिलीप जाधव (२६) व शामराव जाधव (२८) अशी त्यांची नावे आहेत. त्यामुळे याप्रकरणी दोनही टोळीच्या १२ जणांविरोधात पुसेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे. परंतु स्थानिक पोलिसांनी दोघांना अटक केली असून इतर दहा जण फरार होते. त्यापैकी चौघांना खारघर पोलिसांनी सोमवारी दुपारी अटक केली. समीर जाधव (२२), योगेश जाधव (२१), सौरभ जाधव (१७) व कमलेश जाधव (२७) अशी त्यांची नावे आहेत.खारघर परिसरात घडणारी गुन्हेगारी नियंत्रित करण्यासाठी पोलिसांची नाकाबंदी होती. यावेळी हिरानंदानी चौकालगत चौघे जण संशयास्पद उभे असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यांच्या हालचालीवर पोलिसांना संशय आल्याने त्यांना ताब्यात घेतले होते. यावेळी चौकशीत त्यांनी पुसेगाव येथे केलेल्या गुन्ह्याची कबुली दिल्याचे वरिष्ठ निरीक्षक दिलीप काळे यांनी सांगितले. त्याची खात्री पुसेगाव पोलिसांकडून होताच चौघांनाही अटक करण्यात आली. तसेच पुढील तपासाकरिता त्यांना पुसेगाव पोलिसांच्या ताब्यात दिले जाणार आहे. गुन्हा केल्यानंतर लपण्यासाठी ते नवी मुंबईत आले होते. परंतु वेळीच पोलिसांची त्यांच्यावर नजर पडल्याने त्यांना अटक झाली. (प्रतिनिधी)