नवी मुंबईतील खारघरमध्ये भरधाव कारची पाच वाहनांना धडक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2019 13:29 IST2019-01-29T13:28:49+5:302019-01-29T13:29:09+5:30
नवी मुंबईतील खारघर शहरात एका धरधाव कारने रस्त्यावरील वाहनांना धडक दिल्याची घटना घडली. मंगळवारी दुपारी १२.४५ वाजता ही घटना घडली.

नवी मुंबईतील खारघरमध्ये भरधाव कारची पाच वाहनांना धडक
पनवेल : नवी मुंबईतील खारघर शहरात एका धरधाव कारने रस्त्यावरील वाहनांना धडक दिल्याची घटना घडली. मंगळवारी दुपारी १२.४५ वाजता ही घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, खारघरमध्ये सियाज कारने रस्त्यावरुन जाणाऱ्या इतर पाच वाहनांना धडक दिली. दोन रिक्षा, एक कार, तीन दुचाकींना या सियाज कारने धडक दिली. याप्रकरणी कार चालकाला खारघर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच, हा अपघात कसा झाला याबाबत तपास सुरु आहे.