झाडांच्या फांद्या तोडत असताना विद्युतवाहिनीमुळे लागली आग; एकजण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2018 15:11 IST2018-12-22T15:06:42+5:302018-12-22T15:11:06+5:30
नवीन पनवेल येथील विचुंबे गावातील विसपुते कॉलेजजवळ टाटा पॉवरचे झाड्यांच्या फांद्या तोडण्याचे काम सुरु होते. दरम्यान, झाडाची फांदी उच्च दाबाच्या विद्युतवाहिनीवर पडल्याने मोठा स्फोट झाला आणि आगीने पेट घेतला.

झाडांच्या फांद्या तोडत असताना विद्युतवाहिनीमुळे लागली आग; एकजण जखमी
पनवेल - नवीन पनवेल येथील विचुंबे गावातील विसपुते कॉलेजजवळ टाटा पॉवरचे झाड्यांच्या फांद्या तोडण्याचे काम सुरु होते. दरम्यान, झाडाची फांदी उच्च दाबाच्या विद्युतवाहिनीवर पडल्याने मोठा स्फोट झाला आणि आगीने पेट घेतला. या आगीत महापारेषणचा एक कामगार जखमी झाला असून त्याचं नाव सुरेश पाटील (वय ५७) असं आहे. पाटील यांना उपचारासाठी नवीन पनवेल येथील निल रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल केले आहे. नवीन पनवेल अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल आणि आग विझविण्याचे काम केले.
टाटा पॉवरचे आज दुपारी झाडांच्या फांद्या तोडण्याचे काम सुरु होते. दरम्यान दुपारी १२. ४५ वाजताच्या सुमारास फांदी उच्च दाबाच्या विद्युतवाहिनीवर पडल्याने मोठा स्फोट होऊन आगीचा भडका झाला. या आगीत महापारेषणचा सुरेश पाटील हा कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे. पाटील यांच्या उजव्या हात आणि पाय जळाला आहे. सध्या निल रुग्णालयात त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु असून वाशी येथील एका रुग्णालयात हलविण्यात येणार असल्याचे महापारेषणचे अधिकारी सतीश म्हसकर यांनी दिली.