तळोजा एमआयडीसीतील केमिकल कंपनीला आग   

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2021 14:25 IST2021-02-09T14:24:38+5:302021-02-09T14:25:16+5:30

Fire Broke Out : अग्निशामक दलाकडून आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत . 

A fire broke out at a chemical company in Taloja MIDC | तळोजा एमआयडीसीतील केमिकल कंपनीला आग   

तळोजा एमआयडीसीतील केमिकल कंपनीला आग   

ठळक मुद्देतळोजा औद्योगिक वसाहतीतील न्यु केमीकल झोन परिसरात प्लाॅट नं ३४ वर असलेल्या एजीओक्रिस्ट कंपनीला  मंगळवारी साडे  बाराच्या सुमारास अचानक आग लागली.

कळंबोली .  तळोजा औद्योगिक वसाहतीतील एजीओक्रिस्ट  या केमीकल कंपनीला साडे बाराच्या सुमारास अचानक आग लागली आहे. आगीचे लोळ वाढल्याने  आकाशात मोठ्या प्रमाणात धूर  पसरला  आहे. अग्निशामक दलाकडून आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत . 

तळोजा औद्योगिक वसाहतीतील न्यु केमीकल झोन परिसरात प्लाॅट नं ३४ वर असलेल्या एजीओक्रिस्ट कंपनीला  मंगळवारी साडे  बाराच्या सुमारास अचानक आग लागली. याबाबतची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे पनवेल , तळोजा , खारघर ,  येथील बंब घटनास्थळी पोहोचले असू आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरु आहेत . यात जिवीत हानी झाली नसुन वित्त हानी मोठ्या प्रमाणात झाली असल्याचे समजते .

Web Title: A fire broke out at a chemical company in Taloja MIDC