शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

चौथ्या दिवशीही उपोषण सुरूच

By admin | Updated: September 3, 2015 23:34 IST

आदिवासी वसतिगृहातील ३०९ विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल केल्याच्या निषेधार्थ खांदा वसाहतीतील वसतिगृहात विद्यार्थ्यांनी ३१ आॅगस्टपासून आमरण

पनवेल : आदिवासी वसतिगृहातील ३०९ विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल केल्याच्या निषेधार्थ खांदा वसाहतीतील वसतिगृहात विद्यार्थ्यांनी ३१ आॅगस्टपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. मात्र अद्याप तोडगा न निघाल्याने गुरुवारी चौथ्या दिवशीही विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच होते.ठाणे अपर आयुक्तालयांर्गत येणाऱ्या ८७ वसतिगृहांपैकी पेण येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात शेकडो विद्यार्थ्यांनी मोर्चा नेला होता. वारंवार पत्रव्यवहार करूनही वसतिगृहांत व विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण होत नाही. त्यामुळे जवळपास ३५० विद्यार्थ्यांनी पेण प्रकल्प कार्यालयात स्वत: ला कोंडून घेतले होते. यावेळी प्रकल्प अधिकारी रंजना दाभाडे यांनी शैक्षणिक समस्यांचा विचार न करता, गुन्हे दाखल केल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. आमरण उपोषणाचे हत्यार उगारत, प्रकल्प अधिकारी रंजना दाभाडेंवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.तिसऱ्या दिवशी सहा विद्यार्थ्यांची प्रकृती ढासळल्याने त्यांना पनवेल ग्रामीण रु ग्णालय, जेजे व केईएम रु ग्णालयात दाखल करण्यात आले. चार दिवस होवूनही आदिवासी विकास मंत्रालयाच्या वतीने विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी यावेळी केला आहे. आदिवासी विकास विभागाचे ठाण्याचे उपायुक्त किरण माळी यांनी वसतिगृहातील विद्यार्थ्यांची भेट घेतली असली तरी यातून काहीही निष्पन्न झाले नसल्याचे विद्यार्थी प्रतिनिधींनी यावेळी सांगितले. (प्रतिनिधी)