गुन्हे प्रकटीकरणाचे प्रमाण घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2017 07:11 AM2017-12-02T07:11:04+5:302017-12-02T07:11:13+5:30

गतवर्षीच्या तुलनेत यंदा पोलिसांकडून गुन्हे प्रकटीकरणाच्या प्रमाणात घट झाली आहे. त्याशिवाय घडलेल्या गुन्ह्यांमध्ये मुद्देमाल जप्तीचे प्रमाणही कमी आहे. त्यामुळे गुन्हे प्रकटीकरणात राज्यात नावाजल्या जाणा.....

 The extent of crime disclosure has come down | गुन्हे प्रकटीकरणाचे प्रमाण घटले

गुन्हे प्रकटीकरणाचे प्रमाण घटले

Next

- सूर्यकांत वाघमार
नवी मुंबई : गतवर्षीच्या तुलनेत यंदा पोलिसांकडून गुन्हे प्रकटीकरणाच्या प्रमाणात घट झाली आहे. त्याशिवाय घडलेल्या गुन्ह्यांमध्ये मुद्देमाल जप्तीचे प्रमाणही कमी आहे. त्यामुळे गुन्हे प्रकटीकरणात राज्यात नावाजल्या जाणाºया नवी मुंबई पोलिसांची कामगिरी मागील वर्षभरात ढिली पडल्याचे दिसून येत आहे. सोनसाखळी चोरी, वाहनचोरी तसेच घरफोडीच्या गुन्ह्यांचे प्रकटीकरण घटले असून, अशा गुन्ह्यांमध्ये चोरीला गेलेला मुद्देमाल जप्तीचेही प्रमाण कमी झाले आहे. शहरात सर्वाधिक गुन्हे वाहनचोरीचे आहेत. स्थानिक चोरट्यांसह शहराबाहेरील टोळ्या वाहनचोरीच्या गुन्ह्यात सक्रिय आहेत. अशा टोळ्यांचा शोध घेऊन त्यांच्याकडून चोरीची वाहने जप्तीचे आव्हानच पोलिसांपुढे आहे. काही प्रकरणांमध्ये पोलिसांनी कसोटीने गुन्हेगारांना अटक केलेली आहे. मात्र, त्यांच्याकडून अपेक्षित अशी मुद्देमालाची जप्ती होऊ शकलेली नाही. गतवर्षी आयुक्तालय क्षेत्रातून आॅक्टोबर अखेरपर्यंत ५६९ वाहने चोरीला गेली होती. त्यापैकी २४७ गुन्हे उघड झाले असून, सुमारे ३१ टक्के मुद्देमालाची जप्ती झाली आहे, तर चालू वर्षात आॅक्टोबर अखेरपर्यंत ४९२ पैकी अवघे १४७ गुन्हे उघड झाले आहेत. त्यामध्ये गतवर्षीच्या तुलनेत मुद्देमाल जप्तीचे प्रमाण घटून अवघे २४ टक्के झाले आहे.
सोनसाखळी चोरांनी संपूर्ण राज्यात डोके वर काढले असले, तरीही नवी मुंबईत मात्र हे गुन्हे काही प्रमाणात नियंत्रित झाले आहेत. सराईत टोळ्यांच्या मुसक्या आवळून त्यांच्यावर कायद्याचा धाक निर्माण केलेला आहे. त्याशिवाय शहरातल्या प्रत्येक रस्त्यावरील सीसीटीव्हीमुळे पकडले जात असल्यानेही अनेकांनी गुन्ह्याचा मार्ग बदलला असावा. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यात २१ ने घट झाली आहे. मंगळसूत्र हा महिलांचा भावनिकतेशी संबंधित असलेला दागिना असतो. त्यामुळे चोरीला गेलेले मंगळसूत्र परत मिळावे, अशी संबंधित महिलेला अपेक्षा असते. मात्र, जरी गुन्हे नियंत्रित केले असले, तरीही मुद्देमाल जप्तीचे प्रमाण चालू वर्षात २१ टक्क्यांनी घसरले आहे.
दरोड्याच्या गुन्ह्यात मात्र पोलिसांनी अपेक्षित अशी कामगिरी दाखवली आहे. गतवर्षी ८ तर चालू वर्षात ५ घरफोडीचे गुन्हे घडले होते. दोन्ही वर्षांत हे सर्व गुन्हे उघडकीस करण्यात पोलिसांना यश आले आहे. तर चोरीला गेलेला मुद्देमाल जप्तीत गतवर्षाच्या तुलनेत यंदा कौतुकास्पद कामगिरी केलेली आहे. चालू वर्षात आॅक्टोबरपर्यंत घरफोडीच्या ५ गुन्ह्यांत ७ कोटी ३१ लाखांचा ऐवज चोरीला गेला होता. त्यात गतमहिन्यातील बडोदा बँक लुटीच्या घटनेचा समावेश केल्यास तो ऐवज चालू वर्षात सुमारे दहा कोटींचा ऐवज लंपास झाला आहे. त्यापैकी आॅक्टोबरपर्यंतच्या गुन्ह्यातील ४ कोटी १५ लाखांचा ऐवज जप्त करून पोलिसांनी मुद्देमाल जप्तीचे प्रमाण ५७ टक्केपर्यंत नेले आहे; परंतु इतर गुन्ह्यांच्या मुद्देमाल जप्तीचे प्रमाण घटल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह व्यक्त होत आहे.

आयुक्तांची नाराजी

पोलिसांना गुन्हे उघड करण्यात व मुद्देमाल जप्तीमध्ये येत असलेल्या अपयशाचा अप्रत्यक्ष ठपका आयुक्तांच्या कार्यक्षमतेवर उमटत आहे. त्यामुळेच आयुक्त हेमंत नगराळे यांनी नुकत्याच वाशीत झालेल्या कार्यक्रमात याबाबत नाराजी देखील व्यक्त केली आहे. तसेच सर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षक व तपास पथकांनी याचे गांभीर्य घेऊन त्यात सुधार करण्याचाही सल्ला दिला आहे.

वाहनचोरीच्या सर्वाधिक घटना

 

Web Title:  The extent of crime disclosure has come down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस