शहरं
Join us  
Trending Stories
1
बाजारात 'सुवर्ण' धास्ती, देशाला बचतीची संधी; देशाला 'आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी' बनवण्याचा निर्धार
2
संकट : एक कोटी लोकांचा रोजगार धोक्यात; शेअर बाजार कोसळला, रुपया तळाला
3
इर्शाळवाडी ट्रेक ठरला जीवघेणा; डोंबिवलीतील २० वर्षीय रितेशचा मृत्यू, तरुणासोबत नक्की काय घडलं?
4
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
5
मुंबईसह राज्यातील दुकाने, हॉटेल्स, मॉल्स २४ तास सुरू का नाहीत? उद्योग मंत्रालयाने निर्णय घेऊनही अंमलबजावणी नाही
6
अंबरनाथमध्ये आता शिंदेसेनेने भाजपपुढे ठेवला युतीचा प्रस्ताव, राजकीय खेळीची भाजपकडून चाचपणी
7
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
8
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
9
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
10
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
11
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
12
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
13
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
14
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
15
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
16
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
17
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
18
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
19
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
20
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
Daily Top 2Weekly Top 5

मालमत्ता कर अभय योजनेला मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2021 00:31 IST

पालिकेचा निर्णय : १५ डिसेंबरपासून ११२ कोटींचा महसूल जमा

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : मालमत्ता कर थकबाकी वसूल करण्यासाठी महानगरपालिकेने १५ डिसेंबरपासून अभय योजना सुरू केली आहे. या योजनेमुळे १ मार्चपर्यंत ११२ कोटी ३२ लाख रुपये महसूल जमा झाला आहे. नागरिकांना ६० कोटी १० लाख रुपयांची सूट देण्यात आली आहे. सर्व मालमत्ताधारकांना लाभ घेता यावा यासाठी योजनेला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
मालमत्ता कर हा महानगरपालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत आहे. कोरोना काळात अनेक नागरिकांना रोजगार गमवावा लागला. उत्पन्नावरही परिणाम झाला. यामुळे अनेकांना मालमत्ता कर भरता आला नाही. महापालिकेची थकबाकी वाढू लागली.  थकबाकी कमी करण्यासाठी व नागरिकांना दिलासा देण्यासाठी महानगरपालिकेने १५ डिसेंबर ते १५ फेब्रुवारीदरम्यान अभय योजना जाहीर केली होती. दंडाच्या  रकमेमध्ये ७५ टक्के सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. १५ फेब्रुवारीला अभय योजनेची मुदत संपल्यानंतर पुन्हा एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आली होती. आता ही मुदत ३१ मार्चपर्यंत वाढविली आहे. १५ मार्चपर्यंत मूळ रक्कम व २५ टक्के दंड भरल्यानंतर पुढील ७५ टक्के दंड माफ केला जाणार आहे. १६ ते ३१ मार्चदरम्यान दंड रकमेवर ५० टक्के सवलत राहणार आहे. महानगरपालिकेने अभय योजना जाहीर केल्यापासून १ मार्चपर्यंत ११२ कोटी ३२ लाख एवढी रक्कम जमा झाली आहे. नागरिकांना ६० कोटी १० लाख रुपये सूट मिळाली आहे. यामुळे एकूण मनपाची १७२ कोटी ४२ लाख रुपये थकबाकी कमी झाली आहे. आर्थिक वर्षात आतापर्यंत ४४०  कोटी रुपये मालमत्ता कर जमा झाला आहे. आर्थिक वर्ष संपेपर्यंत जास्तीतजास्त कर वसूल करण्यासाठी महानगरपालिकेचा प्रयत्न सुरू आहे. नागरिकांनीही अभय योजनेचा 
लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.